Sanjay shirsat-Imtiaz jaleel Sarkarnama
मराठवाडा

Jaleel Vs Shirsat : जलील यांचा शिरसाटांवर पलटवार : ‘हे सर्व गुवाहाटीच्या खोक्यांनी विकत घेतलं नसावं’

Aimim News : निदा खान प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्यावर गंभीर आरोप करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar, 14 May : निदा खान हिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी अटक केल्यापासून छत्रपती संभाजीनगरचे राजकारण तापले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर थेट आरोप करत तेच निदा खान हिला लपवण्यामागचे मास्टर माईड आहेत, ते अर्बन दहशतवादी आहेत, त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली होती. एवढ्यावरच न थांबता शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मतीन पटेल, इम्तियाज जलील यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, असे पत्रात नमूद केले आहे.

या पत्रानंतर इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पत्रावर भाष्य करतांना थेट आव्हानच दिले. आमच्या एसआयटी चौकशीची जशी मागणी केली तशीच तुमच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी करा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना द्या, मग मी या चौकशीला समोर जायला तयार आहे, असे म्हणत दंड थोपटले आहे.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी संजय शिरसाट यांच्यावर यापूर्वी केलेल्या आरोपाचा उल्लेख करत त्यांना आव्हान दिले आहे. जर या वाचाळ मंत्र्याने त्याच्या बेहिशेबी मालमत्ता, VITS हॉटेल खरेदी, गरीब दलित कुटुंबांना वाटप केलेली सरकारी जमीन मुलाच्या नावावर हस्तांतरित करणे, शेंद्रा येथील ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेली औद्योगिक जमीन आरक्षण बदलून बळकावणे आणि पुन्हा तीच जमीन मुलाला वाटप करणे.

उद्योग सुरू करण्यासाठी आणि एकदा जमीन मिळाल्यावर आता गोदाम बांधणे, यांसारख्या इतर प्रकरणांमध्ये उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र लिहिल्यास, मी या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

नाशिकमध्ये आणि जिल्हा न्यायालयासमोर खरेदी केलेल्या जमिनी आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या प्रचंड मालमत्ता, या सर्व गोष्टी कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत, याचीही चौकशी व्हावी. मला खात्री आहे की हे सर्व गुवाहाटीच्या खोक्यांनी विकत घेतलेले नसेल, असा टोला लगावत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या मागणीवर पलटवार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT