

Solapur, 14 May : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हडपसर ते फलटण आणि फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी गडकरी यांनी बसमधून केली. पंढरपूरहून ते अक्कलोटला हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, त्यांनी तो निर्णय रद्द करत चारचाकी वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या इंधन बचतीच्या आवाहनंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहने कमी केली आहेत. गडकरी यांनी आज पालखी मार्गाची पाहणी करताना आपल्या ताफ्यातील वाहने बाजूला ठेवून बसमधून प्रवास केला. विशेष म्हणजे बससोबतही फक्त तीन पायलट वाहने होती.
दरम्यान, फलटणला आल्यानंतरही पुढे पंढरपूरपर्यंत पालखी मार्गाची पाहणीही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बसमधूनच केली आहे. पालखी मार्गाची पाहणी करत पंढरपुरात त्यांनी काही कार्यक्रमांनाही हजेरी लावली. पंढरपुरात त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरीही भेट दिली.
पुणे ते पंढरपूर हा प्रवास बसने केल्यानंतर नितीन गडकरी यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यात ते हेलिकॉप्टरने अक्कलकोटला जाणार होते. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द चक्क चारचाकी वाहनाने रस्त्याने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गडकरी हे बायरोड पंढरपूरहून, मंगळवेढा आणि पुढे अक्कलकोटला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत सोलापुरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार, माजी आमदार आहेत. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यातील गाड्या जरी कमी झाल्या असल्या तरी मंत्री, आमदार, माजी आमदारांच्या गाड्यांची संख्या असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन आणि नियोजित कार्यक्रमानंतर नितीन गडकरी हे मुक्कामासाठी सोलापुरात येणार आहेत, त्यामुळे गडकरी यांचा संपूर्ण दौरा हा बायरोड होणार, हे आता निश्चित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.