Karuna Munde Latest News Sarkarnama
मराठवाडा

आता करुणा मुंडे घेणार भगवान गडावर दसरा मेळावा

Karuna Munde : मी वंजारी समाजाची सून असल्याने मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे ( Karuna Munde) यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. मी पण वंजारी समाजाची सून आहे. त्यामुळे मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. यामुळे मी दसरा मेळावा घेणारच, अशी भूमिका करूणा मुंडेंनी घेतली आहे, अशी माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा दसरा मेळाव्यावरून 'भगवानगड' (Bhagwangad) चर्चेत आला आहे. (Karuna Munde Latest News)

करूणा मुंडे म्हणाल्या की, मी वंजारी समाजाची सून आहे. त्यामुळे मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी तो घेणारच आहे. यासाठी मी गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची दोन दिवसात भेट घेऊन मेळाव्यासाठीची रितसर परवानगी घेणार आहे. मी महाराष्ट्राची अशी राणरागिणी आहे की माझं नाव घेताच लोक घाबरतात. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सलाम करते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली

दसरा मेळावा हा शिवाजी पार्क आणि भगवानगडावरच होतो हे माहिती होतं. मात्र त्याच्याशिवाय कुठेच होत नाही हे मात्र माहिती नव्हतं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनात आता मी पण रेसमध्ये उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे. मी एका मंत्राची बायको असून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे, असे करूणा यांनी सांगितले.

राज्यात दसरा मेळाव्याचे वाद काही नवीन नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र शिवसेनेचा परंपरागत असलेला दसरा मेळावा हा कोण घेणार यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे याच भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून झालेला वाद महाराष्ट्राने बघितलेला आहे. हा वाद नेमका कुठे पंकजा मुंडे समर्थक विसरत असतांना करूणा मुंडेंनी मी वंजारी समाजाची सुन असल्याने मी दसरा मेळावा भगवान गडावरच घेणार असल्याची भूमिका घेतल्याने पुन्हा जुन्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

करूणा मुंडे दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडेना दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारणारे नामदेव शास्त्री करूणा यांना काय उत्तर देतात आणि त्यांची कशी समजूत काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर होणारा दसरा मेळावा भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी विरोध केल्याने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेले सावरगाव या ठिकाणी घ्यावा लागत आहे. या दसरा मेळाव्याची सुरुवात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. ते दरवर्षी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड येथे लाखो समर्थकांना संबोधित करायचे.

त्यांच्या निधनानंतर ही परंपरा पंकजा मुंडेंनी चालू ठेवली. मात्र मठाधिपती नामदेवशास्त्रींनी यापुढे दसरा मेळावा गडावर होणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर पंकजा यांनी एक वर्षे भगवानगडांच्या पायथ्याशी आपल्या समर्थकांना दसऱ्याच्या दिवशी संबोधित केलं होतं. मात्र पुढील वर्षी त्यांना भगवानबाबांची जन्मभूमीच म्हणजे भगवान भक्तीगडावर मेळावा घ्यावा लागला होता. आजही त्या तेथेच आपला दसरा मेळावा घेत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT