Kirit Somiya & Vilasrao Deshmukh
Kirit Somiya & Vilasrao Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता विलासराव देशमुखांचा परिवार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांना जेरीस आणले आहे. आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेस (Congress) नेत्याकडे वळवला आहे. त्यांच्या टार्गेटवर माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा परीवार आहे. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि त्यांच्या परीवाराने ज्या साखर कारखान्यांचा व्यवहार केला त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे सोमय्या सांगितले. ते लातूरमध्ये बोलत होते.

सोमय्या म्हणाले, लातूरमधील साखर करखान्याच्या व्यवहाराची चौकशी करून डिसेंबरअखेर पर्यंत भ्रष्टाचार समोर आणणार आहे. याबाबत चौकशीची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लातूर जिल्हा बँक काँग्रेसने माफिया पद्धतीने ताब्यात घेतली, असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर व्यतिरिक्त जे घोटाळे केले त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

संजय राऊतांच्या पत्राचे देणार उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत ज्या पत्राचा उहापोह करीत आहेत त्याबाबतची कागदपत्रे लवकरच समोर येतील. त्या पत्राला मी उत्तर देत आहे. दिलेल्या कागदपत्रातील 64 पानात 17 परिशिष्ट आहेत. त्या पत्रात काहीच माहिती नाही. 4 परिशिष्ट हे कराराच्या प्रतिच आहेत. राऊत यांनी पत्रात माझे कौतुक केले. तसे कौतुक माझ्या बायकोने देखील कधी केले नाही, अशा शब्दात त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.

समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलतांना म्हणाले, नवाब मालिकांचे जे सुरू आहे ते चुकीचे आहे. याबाबत खूप घाई सुरू आहे. क्रांती रेडकरने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचा फोटो टाकल्यानंतर मलिक चिडले असावेत. असा चिमटा त्यांनी काढला. कुणाचे खासगी आयुष्य असे समोर आणण्याचा अधिकार मालिकांना आहे का? असा सवाल उपस्थित करत, हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही. वानखेडेची चूक असेल तर, ती समोर येईलच. मात्र, कुणाचे खासगी आयुष्य अश्याप्रकारे समोर आणू नका, असेही सोमय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT