Meghana Bordikar News Sarkarnama
मराठवाडा

Meghana Bordikar News : मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; विजय भांबळेच्या पुतण्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले..

An objectionable social media post targeting Meghna Bordikar has sparked controversy : राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर नोटीस देऊन सोडून दिले. पृथ्वीराज भांबळे याच्यावर कडक कारवाई करा,अशी मागणी भाजपने केली.

Jagdish Pansare

Parbhani Politics : जिंतूरच्या आमदार तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात सोशल मिडिया वाॅर सुरू असतानाच आता माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्याचे समोर आले आहे.

पृथ्वीराज भांबळे याचे फेसबुक पेज वरून त्यावर फेक अकाऊंट तयार करून मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा केला जात आहे. (Meghna Bordikar) मेघना बोर्डीकर- विजय भांबळे यांच्यात संघर्ष उफाळून आलेला असतानाच पुन्हा त्यांच्या पुतण्याचे नाव या प्रकरणात समोर आल्याने तणाव वाढला होता.

राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर नोटीस देऊन सोडून दिले. पृथ्वीराज भांबळे याच्यावर कडक कारवाई करा,अशी मागणी भाजपने केली आहे. (Parbhani) दुसऱ्याच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्चा यात हात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी पृथ्वीराज भांबळे याला ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिले. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी विष्णू नागरे नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने एक आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती.

या प्रकरणात मेघना बोर्डीकरांचे बंधू शिवाजी कदम यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात हे अकाउंट पृथ्वीराज भांबळे याने त्याच्या मोबाईलमध्ये उघडले असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पृथ्वीराज भांबळे याला मंगळवारी रात्री ताब्यात घेतले आणि नोटीस देऊन सोडून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT