omprakashraje nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : संसदेचं दर्शन घेत ओमराजेंनी व्यक्त केला 'हा' निर्धार; म्हणाले...

Omraje Nimbalkar In Loksabha : "लोकशाहीच्या मंदिराला नमन करत जनतेसाठी लढत राहीन," असंही निंबाळकरांनी म्हटलं.

Shital Waghmare

Dharashiv News : लोकशाहीच्या पवित्र सदनात प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने जनतेचा आवाज हा सरकारपर्यंत पोहचवत राहिलो. हे सदन म्हणजे जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे साधन आहे. पैशांच्या नव्हे तर मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा लढू, पुन्हा जिंकू आणि पुन्हा या सदनात लोकांच्या भावना, प्रश्न मांडून न्याय मिळवू, असा निर्धार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांनी व्यक्त केला.

"लोकशाहीच्या मंदिराला नमन करत जनतेसाठी लढत राहीन. मायबाप जनतेच्या प्रेमाने जेव्हा सदनात पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हाच मनाशी गाठ बांधली होती की ही खासदारकी धाराशिव मतदारसंघातील मतदारांनी दिली. तिच्यावर पूर्ण हक्क त्यांचाच आहे," असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"या पवित्र सदनात जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा शेतकरी आणि सर्व समाज घटकांशी संबंधित प्रश्न मांडत राहिलो. तसेच, सरकारबरोबर यथाशक्ती लढा देत राहिलो. यापुढेही मायबाप जनतेच्या आशिर्वादाने लढू आणि पुन्हा जिंकू," असा विश्वास ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केला.

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकरांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. तर, शिंदे गटाकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत धाराशिव मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच धाराशिव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली होती. त्यामुळे आगामी काळात धाराशिवमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT