Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar: खासदार ओमराजेंचे विरोधकांना प्रत्युत्तर; एका फोनवर मी...

अविनाश काळे

Umarga Political News : धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी (Dharashiv Lok Sabha Constituency 2024) महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar)यांनी मात्र दौरे सुरू केले आहेत. जकेकुर-चौरस्ता येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ओमराजेंनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा पाढा वाचला.

ओमराजे निंबाळकरांनी लोकांचे फोन उलण्याशिवाय दुसरी काय कामे केली, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर-उमरगा महामार्गावरून टीकेची झोड उठवली होती. त्याता ओमराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसदेत शंभर टक्के उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध मुद्दे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. एका फोनवर मी सामान्य जनतेची कामे करतो. जनतेशी नाळ जोडून मी काम केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षण, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी आवाज उठवला. माझ्या कामाविषयी चर्चा करण्यासाठी विरोधकांनी एकाच व्यासपीठावर यावे, असे आवाहन त्यांनी केले. "एकीकडे शेतकऱ्यांच्या खते, औषधे बी-बियाणांचे भाव वाढवायचे आणि पीएम सन्मान निधी योजनांचा डांगोरा पिटत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे," असा आरोप ओमराजेंनी केला.

महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते केशव ऊर्फ बाबा पाटील, सुधाकर पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलभीमराव पाटील, काँग्रेसचे जिल्हा सचिव आश्लेष मोरे, नानाराव भोसले, संजय चालुक्य, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश वाले, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे कॉम्रेड अरुण रेणके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आकाश रेणके, जगदीश सुरवसे, कुमार थिटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर टीका करून लोकाभिमुख लोकप्रतिनिधी असलेले ओमराजेंच्या पाठीशी शक्ती उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वेळी शेतकरी जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, उमरगा कृषी उत्पन्न समितीचे सभापती रणधीर पवार, उपसभापती राजेंद्र तळीखेडे, शिवसेना जिल्हा संघटक दीपक जवळगे, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, भगवान जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, विजय वाघमारे, विजय दळगडे, अॅड. सयाजी शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक डी. के. माने, गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर, डीसीसीचे संचालक संजय कांबळे आदी उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT