Dattatray Bharne Sarkarnama
मराठवाडा

Beed News : मंत्र्यांसमोर युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; एक गोरक्षक, तर दुसरा कार्यकर्ता, नेमंक काय घडलं...

Republic Day Beed Minister Dattatray Bharne Dhule Guardian Minister Jayakumar Rawal : बीड अन् धुळे जिल्ह्यात मंत्र्यांसमोर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : प्रजासत्ताक दिनी बीड आणि धुळे जिल्ह्यात युवकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मंत्र्यांसमोर झाला.

या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढचा अनर्थ टळला. या दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बीडमध्ये प्रजासत्ताक दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. पोलिस (Police) दलाच्या पथसंचालनाचे निरीक्षणानंतर मंत्री दत्ता भरणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रम आटोपून भरणे यांचा ताफा सरकारी विश्रामगृहाकडे जाताना एका युवकाने त्यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नितीन मुजमुले, असे या युवकाचे नाव असून बीडच्या (BEED) नगरपालिकेतील घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा, अशी मागणी या युवकाने केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. पोलिसांनी नितीन मुजमुले याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याचे समोर आले.

बीडबरोबर धुळे जिल्ह्यात ध्वजवंदन कार्यक्रमात देखील अशीच घटना घडली. इथं वावड्या पाटील या युवकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. तो शिरपूर इथला असून, स्वतःला गोरक्षक म्हणून घेतो. पोलिसांनी त्यालाही अटकाव करत ताब्यात घेतलं आहे.

गोरक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न....

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून घेत वावाड्या पाटील याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिरपूरमध्ये गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असून, पोलिस निरीक्षक के. के. पाटील ही थांबवत नाही. आम्ही अशा अवैध गोवंशीय वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवण्यासाठी गेल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तसे धमक्या दिल्या जातात. के. के. पाटील यांच्यावर कारवाईसाठी वावड्या पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT