Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' नावांचा समावेश!

Padma Awards for Maharashtra : केंद्र सरकारने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी एकूण १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. ; जाणून घ्या, कोणाचा आहे यादीत समावेश?
Padma Awards 2025
Padma Awards 2025Sarkarnama
Published on
Updated on

Padma Awards 2025 list : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी एकूण १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. केंद्र सरकारने ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते -

विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, अच्युतराव पालव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री अश्विनी भिडे देशपांडे, जस्पिंदर नरुला, राणेंद्र मुजुमदार, सुभाष शर्मा, वासुदेव कामथ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Padma Awards 2025
Enemy Property and Saif Ali Khan : भारत सरकारने घोषित केलेली 'शत्रू संपत्ती' नेमकी कोणती अन् सैफचा काय आहे संबंध?

विलास डांगरे हे होमोपॅथिक चिकित्सक आहेत. तर चैत्राम पवार हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर, मारुती चितमपल्ली हे वन्यजीव अभ्यासक असून त्यांनी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार केले आहे. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे.

Padma Awards 2025
President Droupadi Murmu : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपती मुर्मू यांनी केले देशाला संबोधित, म्हणाल्या...

याशिवाय पद्मभूषण पुरस्कारांमध्ये दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी(मरणोत्तर), पंकज उदास(मरणोत्तर), शेखर कपूर यांची नावे महाराष्ट्रामधून समाविष्ट आहेत.

याशिवाय स्वातंत्र्ययोद्ध्या लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याची मुक्तता करण्यासाठी आंदोलनात भाग घेतला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com