Aditya Thackeray Criticized BJP and shinde Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray Criticized BJP : माझ्या एका ट्विटमुळे त्यांची परदेशवारी रद्द झाली : आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचलं...

Thackeray- Shinde-BJP Politics : आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले.

अनुराधा धावडे

Sambhajinagar News : देशात एका पप्पूने आणि इथे एका आदूबाळाने यांना सळो की पळो करून सोडलंय हे दिसत आहे. त्यांनी माझ्या नावात बाळ असा शब्द वापरला, कारण माझ्या आजोबांचे नावही बाळ असं होतं. पण त्यांच्या भाषेतून त्यांचे विचार किती चिप आहेत हेही दिसायला लागले, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या परदेश दौऱ्यावर काल आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काही तासांतच दोघांचेही परदेश दौरे रद्द करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याच्या खर्चावरही अनेक सवाल उपस्थित केले.

त्यांच्या या आरोपांना उत्तर देताना शेलार यांनी  आदित्य ठाकरे (Aditya Thackearay) यांचा `आदू बाळ`, असा उल्लेख करत टोला लगावला. आदू बाळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला आहे. कारण मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते, असंही त्यांनी सांगितलं.

याबाबत आदित्य ठाकरेंना विचारताच त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाजपचीच भाषा आहे का, आम्हाला वाजपेयी यांची भाषा माहिती होती, पण नव्या भाजपने त्यांच्या मतदारांना आज त्यांची भाषा दाखवून दिली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. एकमेकांच्या सोबत राहून आमचे जुने सहकारीही अशी भाषा वापरत आहेत. पण आम्ही आमची भाषा सोडणार नाही, आमची पातळी सोडणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी परदेशवारी रद्द करण्यामागे अवकाळी पावसाचं कारण सांगितलं गेलं. संभाजीनगरमध्ये त्यांनी एवढी मोठी बैठक घेतली, पण ते शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत. झूमध्ये गेल्यावर वाघाच्या बछड्याच्या नामकरणात आदित्य नाव आले, तेव्हाही ते कसे घाबरले हेही पाहिलं. बॉलिवूडच्या लोकांना वर्षावर बोलावून बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढायचे होते. म्हणून त्यांची वारी रद्द झाली. विधानसभा अध्यक्षांचाही परदेश दौरा माझ्या एका ट्विटमुळे रद्द झाला. परवा उद्योगमंत्रीही परदेशवारीवर चालले आहेत, पण परत एकदा सांगतो, जनतेच्या पैशावर यांनी परदेशवाऱ्या करू नयेत, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये.

त्यांना प्रश्न विचारल्यानंतर इतकं झोंबतं यातच आम्ही त्यांचा खोटेपणा बाहेर आणला आहे. पण माझ्या प्रश्नांमुळे त्यांना किमान खरं बोलावं लागलं आणि खरा जीआर काढायला लागला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी, देशासाठी दैवत आहेत. जर तुम्ही महाराजांची कोणती वस्तू इथे आणत असाल तर तिचं मंदिरात जतन व्हावं ही आमची इच्छा आहे; पण त्या माध्यमातून तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नये. भाजप किती दिवस खोटं बोलत राहणार आणि प्रश्न विचारल्यावर किती त्वेषाने धावून येते हेही पाहिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT