Shinde Group Offers Pankaja Munde:
Shinde Group Offers Pankaja Munde:  Sarkarnama
मराठवाडा

Shinde Group Offers Pankaja Munde: शिंदे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडेंना पायघड्या, पक्षात आल्यास स्वागत...

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Shirsat Offer to Pankaja Munde Politics: गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आज पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा गोपीनाथ गडावर आपली भूमिका मांडली. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेच्या शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे शिंदे गटात आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. (Open offer from Shinde group leader to Pankaja Munde, welcome to join party)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडे शिंदे गटात आल्या तर त्यांचं स्वागतच आहे.त्या शिवसेनेत आल्या तर त्यात वावगं काहीच नाही. असही राज्यात शिवसेना आणि भाजपला सोबतच काम करायचं आहे.पण भाजपमध्येच त्यांना जास्त मान मिळेलं, त्यामुळे त्या भाजप सोडणार नाही, असं मला वाटतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि शिंदे गटाकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे.शिंदे गटाकडे असलेल्या काही महत्त्वाच्या मतदार संघांवर भाजपचे लक्ष आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपचे (BJP) विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. या मतदार संघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असताना आता शिरसाट यांनी पंकजा मुंडेंसाठी पायघड्या घातल्याने भाजप यावर काय प्रतिक्रीया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि शिंदे गटाकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. त्यातच शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमले आहेत.या माध्यमातून भाजपचा शिंदे (BJP-Shinde Govt) गटाच्या खासदारांच्या मतदारसंघावरही डोळा असल्याचं बोललं जात आहे. त्यातच शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने युतीत खडा पडल्याचीही चर्चा सुरु आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT