Banjay Kenekar MLC News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Kenekar News : आमदार होण्याची दोनवेळा हुकलेली संधी अखेर संजय केनेकर यांना मिळालीच!

BJP has nominated Sanjay Kenekar for the Legislative Council election after he missed the opportunity to become an MLA twice. Find out more about his political journey and new role. : अखेर अकरा वर्षानंतर का होईना, पण संजय केनेकर यांच्या नावापुढे आमदार लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. केनेकर हे विद्यार्थी दशेपासून भाजपामध्ये कार्यरत आहेत.

Jagdish Pansare

Marathwada Political News : भाजपाचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस असलेले संजय केनेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाच्या तीन पैकी एका जागेवर केनेकर यांना संधी मिळाली आहे. यापुर्वी दोनवेळा आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. 2014 मध्ये अतुल सावे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि केनेकर यांना माघार घ्यावी लागली. तर प्रज्ञा सातव यांना बिनविरोध विधान परिषदेवर निवडून द्यायचे म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या केनेकरांना तेव्हा माघार घ्यावी लागली होती.

अखेर अकरा वर्षानंतर का होईना, पण संजय केनेकर यांच्या नावापुढे आमदार लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. केनेकर हे विद्यार्थी दशेपासून (BJP) भाजपामध्ये कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्र्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाने त्यांना विविध संघटनात्मक पदावर आतापर्यंत संधी दिली, पण आमदारकीसाठी त्यांचा विचार होऊनही तो प्रत्यक्षात उतरला नव्हता. आक्रमक नेतृत्व म्हणून केनेकर परिचित आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शहरात केनेकर यांनी आक्रमकपणे शहर-जिल्हाध्यक्ष म्हणून संघटना मजबूत केली होती. शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची धमक असलेल्या कार्यकर्ता अशी केनेकर यांची ओळख निर्माण झाली होती. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांना प्रत्युत्तर देत केनेकर यांनी भाजपाला जिल्हा पातळीवर नवी ओळख निर्माण करून देण्यात महत्वाची कामगिरी केली होती.

स्थानिक पातळीवरील नेत्यांशी अनेकदा त्यांचे खटके उडाले, परंतु पक्षश्रेष्ठींनी केनेकर यांचे पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांना झुकते माप दिल्याचे अनेकदा दिसून आले. अकरा वर्षापूर्वी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे संजय केनेकर यांची विधिमंडळात जाण्याची संधी हुकली होती. तेव्हा उमेदवारीची माळ शेवटच्या क्षणी अतुल सावे यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी रंगलेल्या नाराजी नाट्याची जिल्ह्याच्या राजकारणात आजही चर्चा होते.

कोण आहेत संजय केनेकर?

संजय किसनराव केणेकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचेच आहेत. भाजपामध्ये 1988 ते 2024 असा 35 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष पासून ते प्रदेश उपाध्यक्ष अशी 12 वर्ष त्यांनी संघटनेते विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. संभाजीनगर महानगरपालिकेत पंधरा वर्ष नगरसेवक वयाच्या 23 व्या वर्षी उपमहापौर पद केनेकर यांनी भूषवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून दोन वर्ष केनेकर यांनी काम केले.

तर याच आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद सहा वर्ष त्यांच्याकडे होते. महाराष्ट्र शासनाकडून 12 जुलै 2019 रोजी म्हाडाचे सभापती म्हणून काम करण्याची संधी केनेकर यांना मिळाली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी मध्ये राहून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतीय बहुजन कामगार संघ या संघटनेत संस्थापक अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ५२ ठिकाणी संघटनेचे युनियन स्थापन केली. तसेच माध्यमातून 32 हजार सभासद संख्या युनियन अंतर्गत नोंदवून घेतली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT