Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

BJP Municipal Corporation on its own after the assembly election : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही युती न झाल्यास आम्हीही सज्ज असल्याचे सांगत प्रति आव्हान दिले.
Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Smabhajinagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 133 आमदार निवडून आणत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच मुख्यमंत्रीपदावरून वरिष्ठ पातळीवर घोळ सुरू आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्र पक्षांना बाजूला सारून एक हाती म्हणजेच शत प्रतिशत भाजपची सत्ता आणण्याची रणनीती पक्षाकडून राबवली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला (Shivsena) शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही युती न झाल्यास आम्हीही सज्ज असल्याचे सांगत प्रति आव्हान दिले. एकूणच महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Shivsena UBT News : उद्धवसेनेचे पराभूत उमेदवार म्हणतात महाविकास आघाडीतून बाहेर पडा

233 जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. एकट्या भाजपने 133 आमदार निवडून आल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. (Chhatrapati Sambhajinagar) राज्यात सुरू झालेले महायुतीतील हे कुरघोडीचे राजकारण येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसू शकते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत सर्व नऊ जागा जिंकत महायुतीने बाजी मारली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापल्या जागा राखत ताकद दाखवून दिली आहे.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
BJP Political News : लेकींसाठी लढलेले 'बाप माणूस' अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे..

मात्र विधानसभा निवडणुकीत 133 आमदार निवडून आल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा देत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. भाजपचे राज्य प्रवक्ते तथा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे,असे म्हणत संभाजीनगर च्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व तयार होण्यास यासाठी मदत होईल तसेच ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते असे म्हणत स्वबळाचा नारा दिला.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Mahayuti CM : महाराष्ट्रात महाविजय,तरीही 'CM'पदाचा चेहरा जाहीर करण्यास उशीर; काय आहे दिल्लीश्वरांचं जबरदस्त प्लॅनिंग?

दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मात्र सावध भूमिका घेत महापालिका निवडणुकीत एमआयएम ला रोखण्यासाठी भाजपकडे आणि युतीचा प्रस्ताव देऊ. मात्र त्यांनी तो नाकारला आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर आम्हीही तशी तयारी करू ,असे सांगत भाजपाला जशास तसे उत्तर दिले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Maharashtra BJP Victory : ...म्हणून महाराष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष अन् पुरोगामी भूमीत भाजपचे 133 आमदार निवडून आले

गेली पाच वर्ष निवडणुका न झाल्यामुळे महापालिकेवर प्रशासक राज आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे लक्ष जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. येत्या तीन महिन्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता पाहता स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाजीनगर महापालिकेसाठी 115 वार्ड असून 2015 मध्ये सर्वाधिक 28 जागांसह शिवसेना पहिल्या क्रमांकावर तर 24 जागांसह एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर होता.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Eknath Shinde : महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पत्ता कट झाला, तर एकनाथ शिंदेंसमोर 'हे' 3 ऑप्शन असणार

शिवसेना -भाजप युती असल्यामुळे भाजपच्या 22 नगरसेवकांच्या मदतीने 2015 मध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी सत्ता मिळवली. काँग्रेसचे 11, राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले होते.शहरातील 115 वॉर्डांपैकी 65 हे शिवसेना- भाजप चे प्राबल्य असलेले वॉर्ड आहेत. तर 30 वार्ड मुस्लिम व 15 दलित मतदारांचे प्राबल्य असलेले आहेत. 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप या दोन पक्षांना मिळून 30% मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com