Omraje Nimbalkar News Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : महाराष्ट्रातील पहिला निकाल ठाकरेंचा, धाराशिवमधून ओमराजे 'स्पेशल फ्लाइट'ने दिल्लीत?

Osmanabad Lok Sabha Election 2024 Result : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घोतली आहे.

Dnyanesh Savant

Osmanabad Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद असलेला मंत्री, फडणवीसांनी बळ भरलेले माजी मंत्री, सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरचे चार आमदार, एक माजी खासदार यांच्यासह गल्लोगल्ली मिजास करणारे ढिगभर पुढारी... एवढे कमी की काय म्हणून वारेमाप पैसा वापरून साऱ्या सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या ढाण्या वाघाला म्हणजे, ओमराजेंना घेरलं पण, निष्ठेशी 'इमान' राखून असलेल्या मूठभर का होईना शिवसैनिकांच्या बळावर ओमराजेंनी मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांत राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटलांना रोखले. या फेऱ्यांत जवळपास 20 ते 25 हजारांचे मताधिक्य घेऊन धाराशिव हा ठाकरेंचाच असल्याचे दाखवून दिले. स्पेशल फ्लाइटने ओमराजे दिल्लीला जाणार याचा अर्थ भरघोस मताधिक्क्याने ते दिल्लीला जाणार असा आहे.

दुसरीकडे, कोणी कितीही करावे, मीच खासदार राहणार असल्याचेही ओमराजेंना मिळालेल्या आकड्यांतून दिसून येत आहे. थोडक्यात, महाराष्ट्रातील पहिलावहिला निकाल जाहीर झाल्याज जमा असून, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे 'बाहुबली' ओमराजे खासदार जिंकले आहेत, हे नक्की. विशेष म्हणजे, अर्चनाताई पाटलांचे पती राणाजगजितसिंह पाटील हे आमदार असलेल्या तुळजापूर तालुक्यातही ओमराजेंच्या मशालीची धग जाणवली आणि राणांना झळ बसल्याचे दिसत आहे.

प्रचंड आक्रमक प्रचार, ओमराजे, ठाकरेंना घालून पाडून बोलण्याची मंत्री, आमदारांच्या भाषेमुळे धाराशिवकरांना एका झटक्यात सत्ताधाऱ्यांना म्हणजे, ओमराजेंच्या विरोधकांना जागा दाखवून दिली आहे.

एवढ्या मंडळींशी सलग अडीच महिने दोन हात करणाऱ्या या संघर्षात भाजून निघालेले ओमराजे दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर, पालकमंत्री तानाजी सावंतांपासून राणा, शिंदेंचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाडांची काही खैर नसणार, हे आता कोणी ज्योतिषाने सांगू नये.

ओमराजे यांना प्रचाराचा किल्ला एकहाती लढवला. त्यांची यंत्रणा तोकडी होती, मात्र जनता त्यांच्यासोबत होती. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही याचा अंदाज आला होता.

उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण हे चिन्ह हिरावले गेले होते. मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रश्न होता. यासाठी ओमराजे यांनी काही हजार कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचा विचार केला होता, मात्र तो अंमलात आला नाही, असे सांगितले जाते. मशाल हे चिन्ह आधीच लोकांमध्ये पोहोचले होते.

शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळाली. याचा मोठा फायदा ओमराजेंना मिळाला. प्रचार सुरू असताना अनेक लोकांनी ओमराजेंना निवडणूक खर्चासाठी निधी दिला.

कष्ट करणाऱ्या एका मुलीनेही निधी दिला. ओमराजेंकडे प्रचारासाठी पैसे नसतील यातला भाग नाही, मात्र यामुळे लोकांची त्यांच्याप्रति जी भावना होती, ती दिसून आली. महायुतीच्या काही समर्थकांनी या निधीची खिल्ली उडवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT