Dharashiv Lok Sabha Election 2024 : ओमराजेंनी राणादादांना दोनदा पाडलं; तिसऱ्या खेपेला राणादादा भारी ठरणार?

Omprakash Rajenimbalkar and Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमराजे बाजी मारणार की महायुतीच्या अर्चनाताई पाटील, हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहेय.
Dharashiv Lok Sabha Election 2024 : ओमराजेंनी राणादादांना दोनदा पाडलं; तिसऱ्या खेपेला राणादादा भारी ठरणार?

Dharashiv Election Result 2024 LIVE Updates : लोकसभा निवडणुकीचा कौल कुणाला मिळेल, हे काही तासातच निश्चित होणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उडत असलेला राजकारणाचा धुरळा आज खाली बसणार आहे.

निकाल लागल्यानंतर गोंधळ न घालता आपापल्या मार्गाने पुढे जाण्याची परपंरा धाराशिव जिल्ह्यात याही निवडणुकीनंतर जपली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून दोनवेळा पराभूत झालेल्या राणाजगजतिसिंह पाटील हे आता त्यांना पराभूत करून सामना 2-2 असा बरोबरीत सोडणवणार की ओमप्रकाश राजेनिंबाळकर बाजी मारणार, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यात ही लढत झाली. बाजी कोण मारणार, याचा आज दुपारपर्यंत अंदाज येईल. अर्चनाताई यांचे पती, तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranaranjitsingh Patil) यांच्यासह पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाशक्तीकडे प्रचंड शक्ती एकवटलेली असताना महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिवचे आमदार कैलास पाटील, भूम-परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील यांच्या साथीने किल्ला लढवला.

महायुतीचा उमेदवार कोण असेल, याचा तिढा सुरवातीला निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदावर निश्चितीसाठी विलंब लागला. ही बाब राजेनिंबाळकर यांच्या पथ्थ्यावर पडली. महायुतीत एकमत नाही, असा प्रचार त्यांनी सुरू केला.

गावोगावच्या नागरिकांशी, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क राजेनिंबाळकर यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. अर्चनाताई पाटील या राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आहेत. जिल्हाभरात डॉ. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

अर्चनाताई यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली. याशिवाय त्यांचे पती राणाजगजितसिंह हे तुळजापूरचे आमदार आहे. भाजपच्या यंत्रणेसह त्यांची स्वतःचीही यंत्रणा जिल्ह्यात आहेत. याचाही फायदा अर्चनाताई यांना होऊ शकतो.

Dharashiv Lok Sabha Election 2024 : ओमराजेंनी राणादादांना दोनदा पाडलं; तिसऱ्या खेपेला राणादादा भारी ठरणार?
Lok Sabha Election Results : शिव्या-शापाची मशीन 'ऑन'; राऊतांनी मोदी सरकारचा पाडाव करून टाकला...

डॉ. पाटील आणि राजेनिंबाळकर घराण्यात टोकाचे वैर आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडील हे एकेकाळी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. उस्मानाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारानंतर त्यांच्यात दुरावा आला. त्यातूनच पवन राजेनिंबाळकर यांनी डॉ. पाटील यांच्या विरोधात 2004 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यात डॉ. पाटील यांचा निसटता विजय झाला.

Dharashiv Lok Sabha Election 2024 : ओमराजेंनी राणादादांना दोनदा पाडलं; तिसऱ्या खेपेला राणादादा भारी ठरणार?
Chhatrapati Sambhajinagar Vote Counting : छत्रपती संभाजीगरचा खासदार कोण? दुपारीच होणार चित्र स्पष्ट

पुढे 2006 मध्ये पवन राजेनिंबाळकर यांचा मुंबईत खून झाला. त्यानंतर या दोन कुटुंबांतील वितुष्ट वाढले. वडिलांच्या खुनानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर राजकारणात आले. त्यांनी एकवेळा विधानसभा आणि एकवेळा लोकसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला.

राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा एका विधानसभा निवडणुकीत पराभव केला. या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पराभव करून राणाजगजितसिंह पाटील सामना 2-2 असा बरोबरीत आणणार का, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com