Dharashiv News : धाराशिव जिल्हयातील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली असून ही निवडणूक चुरशीची होत असल्याचे पहिल्याच निकालावरून स्पष्ट झाले आहे. ढोकी जिल्हा परिषद गटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला असून त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असले तरी मतमोजणी सुरु झाली असून धक्कादायक निकाल समोर येत आहेत. धाराशिव जिल्हयात . ढोकी जिल्हा परिषद गटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विजयी होत खाते उघडले आहे. ढोकी गटातून ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार अमर समुद्रे केवळ एक मताने विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीची लढत होत आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे तेर गटातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
धाराशिव जिल्ह्यातील या निवडणुकीत जिल्ह्याची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.