Shivsena Politics : "आमच्याकडे 237 आमदार, उगाचच धाडस..." उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिलेदाराने डिवचलं

Uddhav Thackeray MLC Term : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मविआकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. शिवाय अशा परिस्थितीत ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवणार की पक्षातील इतर नेत्याला संधी देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Uddhav Thackeray addressing party workers amid growing discussions over his re-entry into the Maharashtra Legislative Council ahead of the upcoming MLC elections.
Uddhav Thackeray addressing party workers amid growing discussions over his re-entry into the Maharashtra Legislative Council ahead of the upcoming MLC elections.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 09 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपत आहे. हा कार्यकाळ संपल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

तर ठाकरेंच्या विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. विधान परिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होते. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या चर्चांवर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, "विधान परिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होते. आमच्याकडे 237 आमदार आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची मला एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण कल्पना आहे.

Uddhav Thackeray addressing party workers amid growing discussions over his re-entry into the Maharashtra Legislative Council ahead of the upcoming MLC elections.
Ichalkaranji Mayor Election : इचलकरंजी महापौर-उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम चुकीचा? फेरनिवडणूक राबवावी लागण्याची शक्यता

तर आता उदय सामंत यांच्या वक्तव्यावर ठाकरेंची शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Uddhav Thackeray addressing party workers amid growing discussions over his re-entry into the Maharashtra Legislative Council ahead of the upcoming MLC elections.
ZP Election Results 2026 : निकाल जाहीर होण्याआधीच झेडपी आणि पंचायत समितीच्या 'या' 27 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, पाहा संपूर्ण यादी

शिवाय अशा परिस्थितीत ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवणार की पक्षातील इतर नेत्याला संधी देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संख्याबळ पाहता महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार निवडून येऊ शकतात.

तर मविआकडे 48 आमदार आहेत. ज्यामध्ये ठाकरेंचे 20 आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला पाठिंबा दिल्यास ठाकरेंना विधान परिषदेसाठी या पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com