Parli Assembly Sarkarnama
मराठवाडा

Parli Assembly Constituency : भाजप कार्यकर्त्यांची खदखद; मुंडे भावंडे कसा मार्ग काढणार

Datta Deshmukh

Beed News : महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागाने सर्वच राजकीय समीकरणे बदलली. परळीत, तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी जागा कोणाला? हा मोठा पेच निर्माण झाला होता.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरील संधीनंतर ही जागा धनंजय मुंडेंनाच मिळणार, यावरही शिक्कामोर्तब झाले. आता परळीमधील भाजप पदाधिकाऱ्यांची समोर आलेली खदखद धनंजय मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. निवडणुकीपूर्वी ही खदखद दूर करण्याचे आव्हान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासमोर आहे.

राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील व्यक्तिगत संबंध सुधारलेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सर्व प्रकारची यंत्रणा आणि आपली सर्व ताकदही वापरली. त्यामुळे या निवडणुकीत परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांची ताकद मोठीच मानली जाते. परंतु परळी शहरातील आर्य समाज सभागृहात भाजपया पदाधिकाऱ्यांच्या बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आवळला.

परळी शहरात कुठेही विचारणा होत नाही, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, अशा तक्रारींचा सूर होता. आपल्या भावना पंकजा मुंडे यांच्यापर्यंत पोचविण्याचा निर्णय घेत पंकजा मुंडे यांनी जर काही विचार नाही केला, तर सामूहिक राजीनामे देण्याची भूमिकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले. येथील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांच्या पचणी पडले नसल्याचे यातून दिसते. कायम एकमेकांच्या विरोधात असलेले पदाधिकारी भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे जुळत नाही.

NCP And BJP सूत जुळना

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे स्वतः उमेदवार असल्याने काही भाजपचे पदाधिकारी प्रचारात उतरले, तर काही पदाधिकारी प्रचारापासून दूर राहिले. संपूर्ण प्रचार यंत्रणा धनंजय मुंडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडेच होती. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत गेली. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी पराभवाचे नारळ एकमेकांवर फोडत आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांची खदखद

या बैठकीत गेल्या 17 वर्षापासून असलेल्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षात नेतृत्व कडून मिळणारी वागणूक, पक्षाच्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचे न केलेले सहकार्य, पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यकाकडून मिळणारी वागणूक, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सातत्याने शहरातील निर्णयप्रक्रियेत डावलणे, अशा प्रकारची खदखद या बैठकीत सर्वांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना भेटून यासंदर्भात माहिती देवू त्यांनी काही कार्यवाही नाही केली, तर सामुहिक राजीनामे देण्यात येणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनं नाव न टाकण्याच्या अटींवर माहिती दिली. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला विचारमंथन बैठक नाव देत सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT