Mahayuti News : लातूर जिल्ह्यातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा; शिंदे गटाचा या दोन जागेवर दावा

Political News : अधिकृत जागावाटप होण्या अगोदरच लातूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीतल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरात सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या महायुतीच्या जागावाटपात रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील महायुतीच्या जागा वाटपावरून मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये लढत राहणार असली तरी जागा वाटपावरून मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, अधिकृत जागावाटप होण्या अगोदरच लातूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीतल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. (Mahayuti News)

लातूर जिल्ह्यातील जागावाटपात महायुतीमधील घटक पक्षाकडून करण्यात येत असलेल्या दाव्यामुळे ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. विशेषतः २०१९ च्या निवडणुकीत लातूर शहर जागेवर भाजपचा (Bjp) उमेदवार होता तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार होता. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.

याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही जागांवर दावा ठोकण्यात आला आहे. तर या आधी लातूर ग्रामीणच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार होता. तर शहर विधानसभा परंपरेने भाजपची जागा आहे. मात्र, या दोन्ही जागांवर आता महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता नेमकी कोणती जागा कुणाला सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mahayuti News
Mahayuti News : हडपसर मतदारसंघावरून सस्पेन्स कायम; तुपेंना धाकधूक तर भानगिरे यांच्या आशा पल्लवीत

महायुतीच्या जागावाटप होत असताना शिंदे गटाकडून या दोन जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या वाट्याला कोणत्या जागा येणार याची उत्सुकता आहे. या ठिकाणी पक्षीय बलाबल पहिले तर औसा, निलंगा भाजपकडे तर उदगीर, अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. तर लातूर शहर व लातूर ग्रामीण काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याचमुळे शिंदे गटाने या दोन जागेवर दावा केला आहे.

Mahayuti News
MVA News : अखेर 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसच मोठा भाऊ; कोणत्या पक्षाला किती जागा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com