Pankaja Munde - Sharad Pawar Meeting Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर टीका; ...म्हणाल्या, 'विरोधी उमेदवाराची चिंता नाही'

Beed lok Sabaha election 2024 News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीची घोषणा आज करण्यात आली, मात्र यामध्ये बीड लोकसभेसाठीचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही.

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून बीड लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपच्या पहिल्या यादीतच बीड लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे ऐवजी त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडेंना दिली आहे.

उमेदवारी जाहीर होऊन 15 दिवसापेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीची घोषणा आज करण्यात आली, मात्र यामध्ये बीड लोकसभेसाठीचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. (Pankaja Munde News)

बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला नसल्याने उमेदवाराबाबतचा सस्पेन्स कायम आहे. या यादीत बीडच्या उमेदवाराचं नाव नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार? हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.

माझ्या विरोधात अजूनही उमेदवार नसल्याने माझा राजकीय फायदाच आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या आणि मित्र पक्षांच्या नेत्यांच्या सध्या भेटी घेत आहे. सध्या काही राजकीय पक्षांचे दोन पक्ष तयार झाले आहेत. त्यामुळे उमेदवार देण्यासाठी कदाचित वेळ लागत असणार आहे. कोणत्या जागेवरून कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत असल्याने काही ठिकाणी उमेदवार देण्यास विलंब लागत आहे. तर माझ्या विरोधात कोण उमेदवार येईल याची मला चिंता नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेटे की सोनावणे चर्चा कायम

बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. या दोघांपैकी एक नाव फायनल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २ एप्रिलला नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पंकजा मुंडेंचा भेटीगाठीवर भर

लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या आणि मित्र पक्षात असलेल्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. पंकजा मुंडे यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात असलेले योगेश क्षीरसागर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

SCROLL FOR NEXT