Maharashtra Politics : नवनीत राणा अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांनी नुकतीच अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतली. राणा यांना महायुतीतील बच्चू कडू यांच्याकडून विरोध होतो आहे. त्यांच्या प्रहार संघटनेकडून नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यात नवनीत राणांवर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
2014 ला म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं?, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते. महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही, असे म्हणत अंधारे (Sushma Andhare) यांनी नवनीत राणांवर टीका केली.
रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का? असे म्हणत अंधारे यांनी नवनीत राणा यांचा पराभूत करण्याचे आवाहन केले. हनुमान चालीसावर ज्या बाईने वादंग केले. त्यांना अजुनही हनुमान चालीसा म्हणता येत नाही, असे म्हणत राणांना (Navneet Rana) डिवचले.
इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. शेतमालाला भाव नाही. हे सरकार शेतकऱ्यांना छळत आहे. कापसाला 11 हजार रुपये दर हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मिळाला. आज 6 हजार रुपये पेक्षा कमी मिळत आहे. भावनिक होऊन मतदान करू नका, असे आवाहन अंधारे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.