Beed Loksabha News : जयदत्त क्षीरसागरही बीडच्या मैदानात; पण ताकद स्वत:साठी दाखवणार की...

Loksabha Election 2024 : मागच्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार होते. मात्र, त्यांनी मेळावा घेत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या मागे ताकद उभी केली होती.पण त्यांना...
Beed Loksabha News
Beed Loksabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरु झाल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही दौरे सुरु केले असून त्यांना प्रतिसादही भेटत आहे. मात्र, आताही ताकद ते स्वत:साठी वापरणार की कोणाच्या मागे उभी करणार हे पाहणे महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाला मिळालेल्या एकमेव विजयात (2004 रोजी जयसिंगराव गायकवाड) जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा वाटा आहे. आता त्यांनाही निवडणुक लढविण्याची मोठी संधी असली तरी ते नेमका कोणता निर्णय घेतात,याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनीही पंचायत समिती सभापती ते राज्याचे विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास केलेला आहे. मातब्बर राजकारणी असलेल्या जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाभर जाळे आहे. तत्कालीन चौसाळा विधानसभा मतदारसंघ व बीड विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), उर्जा, रोहयो अशी महत्वाची खाती सांभाळलेली आहेत.

Beed Loksabha News
Loksabha Election 2024 : लातूर भाजपचा मेळावा; कार्यकर्त्यांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ओबीसींचे मास लिडर अशी ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर मंत्री छगन भुजबळ यांच्या गटातील मानले जात. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक निवडणुकांत यशस्वी राजकीय डावपेच खेळणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकमेव विजय मिळवून दिलेला आहे. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत जयसिंग गायकवाड यांच्या विजयात सर्वात मोठा वाटाच जयदत्त क्षीरसागर यांचा होता.

दरम्यान, जिल्ह्यात पक्षात अजित पवार यांची वाढती राजकीय ताकद आणि बीड जिल्ह्यातील हस्तक्षेपामुळे जयदत्त क्षीरसागर अनेकदा हतबल असत. अगदी पालकमंत्री असतानाही मतदार संघाच्या बाहेर त्यांना राजकीय निर्णयाचा वाव नसायचा. बहुतेक निर्णय अजित पवारच मुंबईहून घेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले जिल्ह्यात एकमेव आमदार होते. मात्र, त्यांच्याशी बंड केलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांना अजित पवार समर्थक धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आदी नेते बळ देऊ लागल्याने जयदत्त क्षीरसागर अस्वस्थ होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या काळी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी विकास कामांच्या निमित्ताने सतत संपर्क असे. दरम्यान, अखेर मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी समर्थकांचा मेळावा घेत त्यावेळच्या भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. मात्र, त्यांना भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करावा लागला.

कारण, पंकजा मुंडे (Pankaja Munde) व जयदत्त क्षीरसागर हे दोघेही ओबीसी नेते असल्याने एकाच ‘म्यानात दोन तलवारी’ कशा, असा प्रश्न होता. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना मंत्री केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला. या पराभवात देखील बीडच्या भाजपने हातभार लावल्याचे लपून नाही. पुढे शिवसेनेतील अस्वस्थता आणि राज्यातील सत्तांतरामुळे त्यांनी अनेकदा भाजप प्रवेशाचे प्रयत्न केले. मात्र, देवेंद्र फडणवीस अनुकुल असूनही त्यांचा आजघडीपर्यंत तरी पक्षात प्रवेश झालेला नाही.

सध्यातरी क्षीरसागर कोणत्या पक्षात नाहीत. आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून भाजकडून उमेदवारी जाहीर झालेल्या पंकजा मुंडे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून स्पर्धेत असलेले बजरंग सोनवणे व डॉ. ज्योती मेटे यांनीही जिल्ह्यात भेटीगाठींचे सत्र सुरु केले आहे. दोन दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) देखील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांनाही नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता क्षीरसागर आजमावत असलेली ताकद कोणाच्या मागे लावणार असा प्रश्न आहे.

Beed Loksabha News
Lok Sabha Election 2024 : पाटलांच्या माघारीनंतर बाबांच्या उमेदवारीची चर्चा; शरद पवारांचा मात्र वेगळा सूर...

मागच्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असून फडणवीसांच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांना अगदी जिल्हा नियोजन समितीचा निधीही मिळाला आहे. मात्र, त्यांना भाजपमध्ये एंट्री भेटलेली नाही. मागच्या प्रमाणे भाजपचे काम करावे तर त्या बाजूचे सर्वच त्यांचे राजकीय विरोधक आहे. त्यामुळे आता क्षीरसागर स्वत:चा लोकसभेबाबत काही विचार तर करत नाहीत ना, असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडत आहे.

सध्याचे राजकीय समीकरण व वातावरण पाहता त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी फायद्याची ठरु शकते, असे गणित राजकीय जाणकारांकडून मांडले जात आहे. सध्या त्यांना कुठलाच पक्ष नसून भाजपमध्येही त्यांच्या एंट्रीला अनेकांचा विरोध आहे. तर, शिवसेनेत प्रवेश केला तरी बीडमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात आपली राजकीय ताकद वाढविण्याची संधीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मिळू शकते. मात्र, ते सध्या फिरताहेत कोणत्या कारणांनी याचे पत्ते गुपित आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Beed Loksabha News
Bhagat Singh Koshyari : अनंत अंबानी यांच्याकडून घेतलेल्या 15 कोटी निधीचं काय केलं? कोश्यारी म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com