Vaidaynath Bank News Parli-Beed Sarkarnama
मराठवाडा

Vaidyanathan Bank Election News : वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम! फड हरले, कराड जिंकले..

Pankaja Munde continues her dominance over Parli’s Vaijnath Bank as the panel moves towards a one-sided victory : वैद्यनाथ बँकेवर सुरुवातीपासून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व अशोक सामंत यांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या वेळी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे या निवडणुकीत स्वतंत्र लढले होते.

Jagdish Pansare

Beed Politics News : परळीच्या दि वैद्यनाथ को- ऑपरेटिव्ह बँकेवर पुन्हा एकदा मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे आमदार रमेश कराड हे भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राजाभाऊ फड यांना केवळ 1407 मतं मिळाली असून त्यांचे डिपाॅझीट जप्त झाले आहे. तर विजयी उमेदवार रमेश कराड यांचा 14316 मतांनी विजय झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी आघाडीवर आहेत, तर विरोध पॅनलचे उमेदवार बरेच मागे पडल्याचे चित्र आहे.

दि वैद्यनाथ को ऑपरेटिव्ह बॅकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून रविवारी (ता.10) 13 संचालकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. (Parli) आज सकाळपासून बीड येथे मतमोजणीला सुरूवात झाली असून यामध्ये भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या मतदारसंघातून रमेश कराड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर उर्वरित 12 उमेदवारांची मोठ्या मताधिक्याने विजयाकडे एकतर्फी वाटचाल सुरू आहे. यामुळे मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होत आहे.

वैद्यनाथ बँकेवर सुरुवातीपासून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व अशोक सामंत यांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या वेळी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे या निवडणुकीत स्वतंत्र लढले होते. त्यावेळी पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) एकहाती बँक ताब्यात घेतली होती. तर यावेळी मुंडे बहीण भाऊ एकत्र असल्याने बँकेवर त्यांचेच वर्चस्व कायम राहणार अशी सुरुवातीपासून चर्चा होती. विरोधकांना फक्त तीनच उमेदवार या निवडणुकीत उभे करता आले.

यामध्ये भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष रमेश कराड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड तर सर्वसाधारण मतदारसंघात बाबासाहेब शिंदे व वैजनाथ डंपलवार यांनी निवडणूक लढवली होती. आज आतापर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये जवळपास 10 हजार मतांची मोजणी झाली असून यामध्ये विरोधी गटाच्या उमेदवारांना एक ते दोन हजार मते तर सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना आठ हजार पेक्षा जास्त मते पडली आहेत. उर्वरित सहा हजार मतांची मोजणी सुरू आहे.

बँकेच्या 17 संचालक मंडळाच्या जागांसाठी रविवारी 108 केंद्रावर मतदान पार पडले. बँकेच्या 4 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. ‌

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT