Dhananjay Munde On Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेसाहेबांचा संघर्ष मी सावलीसारखा सोबत राहून अनुभवला! संघर्ष आमच्या पाचवीला पूजलेलाच..

Dhananjay Munde recalls experiencing Gopinath Munde’s lifelong struggle as a constant presence : आज गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा चालवणारे देवेंद्र भाऊ राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, हे पाहून मुंडे साहेब स्वर्गातून समाधान व्यक्त करत असतील!
Dhananjay Munde On Gopinath Munde News Latur
Dhananjay Munde On Gopinath Munde News LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur Politics News : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत मी सावलीसारखे राहून त्यांचा संघर्ष अगदी जवळून पाहिला व अनुभवलेला आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्षाचा साहेबांचा इतिहास आहे. मुळात संघर्ष हा आमच्या मुंडे कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेला आहे, अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या काकांच्या आठवणींना उजाळा दिला.

लातूर येथे जिल्हा परिषदेच्या वतीने परिसरात उभारलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष आणि यातही त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. गोपीनाथ मुंडेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्वांचीच इच्छा होती, मात्र दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर निघून गेले.

आज त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे देवेंद्र भाऊ राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, हे पाहून मुंडे साहेब स्वर्गातून समाधान व्यक्त करत असतील! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटन वाढीचे काम करताना मुंडे साहेबांनी कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मंचावर उपस्थित सर्वच जण मुंडे साहेबांच्या विचाराचे वारस आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

Dhananjay Munde On Gopinath Munde News Latur
Devendra Fadnavis : संघर्ष अन् सत्तेशी कधीही समझोता न करण्याची शिकवण मला गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी दिली!

2011 मध्ये महाराष्ट्राच्या भाजपचा अध्यक्ष करण्याचा निर्णय जेव्हा सुरू होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचवले आणि त्यांना अध्यक्ष केलं. ते नेहमी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एखादा कर्तृत्ववान कार्यकर्ता पुढे जाऊन या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. मुंडेसाहेबांचा आशीर्वाद फडणवीसांना एकदा नाही, तीनदा मुख्यमंत्री म्हणून मिळाला. त्यांचे स्वप्न ते पूर्ण करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी मुंडेसाहेबांनी संघर्ष केला आणि म्हणून आपण त्यांना संघर्षयोद्धा म्हणतो.

Dhananjay Munde On Gopinath Munde News Latur
Pankaja Munde On Gopinath Munde : मुंडेसाहेबांच्या वारशासोबत संघर्ष अन् कारस्थानही माझ्या वाट्याला! पण स्वाभीमान गहाण ठेवला नाही..

याचवेळी व्यासपाठीवर उपस्थित लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून तुमच्या जिल्ह्यातील रेणापूर मतदारसंघाला लागूनच माझा परळी मतदारसंघ आहे. विकासकामांना निधी देताना आमच्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात देखील विकासासाठी सहकार्य करा, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com