Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी अडवली; 'एक मराठा-लाख मराठा' घोषणाबाजी!

Beed Lok Sabha Election 2024 : बीडच्या राजकारणात आता मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभाव टाकू शकतो. मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांनांही मोठा नाराजीचा सामना करावा लागला.

Chetan Zadpe

Beed News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण हा प्रमुख् मुद्दा आहे. मराठा आंदोलनासाठी रान राज्यव्यापी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटीलही बीड जिल्ह्यातून येतात. यामुळे बीड जिल्ह्याच जरांगे यांचे आंदोलनाच्या बैठका आणि रणनीती बीड जिल्ह्यात होत असतात. मात्र आताच्या निवडणुकीत मराठा आरक्षण हा अजूनही ज्वलंत प्रश्न आहे.

भाजप उमेदवापुढे 'मराठा समाजाचा रोष' हा भेडसवणारा मुद्दा आहे. बीड लोकसभेत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आहेत. सोनवणे हे कुणबी समाजाचे असून, बीडच्या राजकारणात आता मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभाव टाकू शकतो. मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांनांही मोठा नाराजीचा सामना करावा लागला. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या उमेदवार पंकडा मुंडे यांचा प्रचारासाठी निघालेले आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी मराठा समाजातील तरुणांनी अडवली. यावेळी त्यांनी 'एक मराठा लाख मराठा'अशी घोषणाबाजी करत आमदारांना गावात प्रवेश करण्यास विरोधही केला. आमदार सोळंके हे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रतारासाठी माजलगालव येथील वांगी या गावात जाणार होते. सोळंके हे कार्यकर्त्यांची बैठक घेत होते, दरम्यान मराठा आंदोलक तरुणांनी सोळंके यांना जोरदार विरोध दर्शवला. यामुळे मराठा आंदोलकांच्या रोषाला महायुतीच्या नेते-आमदारांना सामोरे जावे लागत आहे.

सोळंके यांचे घर जाळले होते -

आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke) यांचं घर मराठा आंदोलनाच्या दरम्यानच्या काळात काही समाजकंटकांनी जाळले होते. हा मराठा आंदोलकांचा रोष असल्याचे असा प्राथमिक अंदाज होता. यामुळे आमदार सोळंके यांच्याकडूनही संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा लोकसभा निडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन तरुणांच्या रोषाचा सामना सत्ताधारी आणि महायुतीच्या नेत्यांना करावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT