Heamant Kshirsagar Join BJP As Soon As News Beed Sarkarnama
मराठवाडा

Sandip Kshirsagar : बीडमध्ये पंकजा मुंडेचा मोठा डाव; आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊच भाजपच्या वाटेवर!

Beed Local Body Election 2026 : आतापर्यंत भावाच्या पाठीशी उभे राहत त्यांना खंबीर साथ देणारे हेमंत क्षीरसागर यापुढे मात्र भावाच्या विरोधात उभे ठाकलेले दिसणार आहेत.

Jagdish Pansare

  1. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी मोठा राजकीय डाव टाकत राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सख्ख्या भावाला भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

  2. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, बीडमधील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

  3. पंकजा मुंडेंनी या हालचालीमुळे आगामी निवडणुकीसाठी आपली रणनीती अधिक मजबूत केली आहे.

Beed Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मला माझा पक्ष वाढवायचायं, आता आम्ही पराभव पाहणार नाही, असे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतून रणशिंग फुंकले होते. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, गेवराईचे बाळराजे पवार यांचा पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मोठा डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर यांना गळाला लावले आहे. हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात असून या प्रवेशाने बीडमध्ये भाजपा बाजी पलटवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. आजच परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. धनंजय मुंडेंसाठी हा धक्का असल्याचे बोलले जात असताना अवघ्या काही तासातच पंकजा मुंडे यांनी थेट आमदाराच्या भावाला फोडल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. हेमंत क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाने बीड नगरपरिषदेची निवडणुक चुरशीची होणार हे वेगळं सांगायला नको.

बीड जिल्ह्यातील क्षीरसागर घराणं हे राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखले जाते. दिवंगत केशरकाकू क्षीररागर यांचा राजकीय वारसा जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर हे चालवत आहेत. राजकीय वारसा चालवत असले तरी काका विरुध्द पुतण्या, भाऊ विरुद्ध भाऊ असा संघर्षही बीडमध्ये पहायला मिळतो. या अंकात आता हेमंत क्षीरसागर यांचे नाव समोर येऊ लागले आहे.

बीड नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पद भूषवलेले हेमंत क्षीरसागर हे शहराच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये जात आहोत, असे सांगितले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. परळीच्या दिवाळी स्नेहमिलन मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपण यापुढे बेरजेचे राजकारण करणार, असे स्पष्ट सांगितले होते. त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केल्याचे हेमंत क्षीरसागर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून दिसते आहे.

आतापर्यंत भावाच्या पाठीशी उभे राहत त्यांना खंबीर साथ देणारे हेमंत क्षीरसागर यापुढे मात्र भावाच्या विरोधात उभे ठाकलेले दिसणार आहेत. संदीप क्षीरसागर यांचे हेमंत हे धाकटे भाऊ आहेत.आतापर्यंतच्या सर्व नगरपरिषद निवडणुकीत ते सक्रीय राहिले आहेत. विधानसभेच्या प्रचारातही त्यांनी संदीप क्षीरसागर यांना भक्कम साथ दिली होती. बीड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ कारभार पाहिला आहे. आता भाजपमधून हेमंत क्षीरसागर आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहेत.

FAQs

1. पंकजा मुंडेंनी नेमका कोणता डाव टाकला?
→ त्यांनी राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सख्ख्या भावाला भाजपमध्ये प्रवेश देण्याची खेळी केली आहे, ज्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले.

2. हा प्रवेश कुधी होणार आहे?
→ हा प्रवेश लवकरच मोठ्या सोहळ्याने बीड किंवा मुंबईत पक्ष कार्यालयात होणार आहे.

3. या घडामोडीचा बीडच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
→ भाजपचा प्रभाव वाढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संघटनात्मक तोटा होण्याची शक्यता आहे.

4. पंकजा मुंडे आणि क्षीरसागर यांच्यातील वाद जुना आहे का?
→ होय, बीडमधील दोन्ही गटांमध्ये दीर्घकाळापासून राजकीय स्पर्धा आणि वाद सुरू आहेत.

5. आगामी निवडणुकीवर या हालचालीचा काय परिणाम होईल?
→ ही चाल भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते आणि पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये नवे समीकरण निर्माण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT