Beed News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्वभाव आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. दुसरीकडे सुरेश धसांच्या टोल्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवारही केला. फडणवीसांना ते बाहुबली म्हणाले तर मला शिवगामी म्हणायचे. मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. त्यामुळे बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना प्रत्युत्तर दिले. येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव करणार नाही. मी काम करताना जात-धर्म पाहत नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह आमदार उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी भूमिका घेताना मागे पुढे पाहायचं नाही ही गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. आजच्या कार्यक्रमाला मी येणार की नाही अशी चर्चा होती. का नाही येणार? सुरेश अण्णा तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं. तेव्हा साडी आणि पत्रिका घेऊन आला होतात. सागरचं लग्न कराल तेव्हा बोलावलं तर येईल, नाही तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलावलं तर येईल. हा सरकारी कार्यक्रम आहे. बॅनरवर फोटो आहे का हे मी पाहिलं नाही. शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आले, असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.
बीडमध्ये सहापैकी पाच आमदार निवडून येतात. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा लकी आहे. 2019 मध्ये बीडमध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आहेत. आता आमचे आमदार निवडून आले. अजित पवार यांचे आमदार आपल्यासोबतच आहेत. आज अजितदादा पालकमंत्री आहेत. ते आपल्याला नेहमी सहकार्य करतील, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.