Dada Bhuse : धनंजय मुंडेंवरील आरोपावर दादा भुसेंचे कानावर हात, म्हणाले मी कृषीमंत्री असताना...

Dada Bhuse on Dhananjay Munde : शालेय शिक्षण मंत्री या नात्याने दादा भुसे आज आढावा घेण्यासाठी नागपूरला आले असता त्यांनी विभागवार आढावा बैठका घेऊन शाळांच्या प्रगतीसाठी काय काय करण्याची गरज आहे हे जाणून घेतले.
Dada Bhuse  Dhananjay Munde
Dada Bhuse Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमानिया यांनी यांनी केला आहे. डीबीटी धोरण गुंडाळून कृषी मंत्री असताना मुंडे यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच वातवारण तापले असताना राज्याचे माजी कृषी मंत्री तसेच विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले.

कोणी कोणावर काय आरोप केले हे मला ठावूक नाही. डीबीटीचे धोरणानुसारच माझ्या खात्याचे सर्व व्यवहार होत असल्याचा दावा त्यांनी केला. शालेय शिक्षण मंत्री या नात्याने दादा भुसे आज (बुधवारी) आढावा घेण्यासाठी नागपूरला आले असता त्यांनी विभागवार आढावा बैठका घेऊन शाळांच्या प्रगतीसाठी काय काय करण्याची गरज आहे हे जाणून घेतले.

Dada Bhuse  Dhananjay Munde
Delhi Assembly Elections: CM आतिशी, केजरीवालानंतर आता AAPच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल

नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रिपदाच्या वादावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याने पालकमंत्रिपद हवे आहे. जनतेचे प्रश्न सोडावर येत असल्याने प्रत्येकाला पालकमंत्री आपल्याकडे हवे आहे. यात काही गैर नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे. कोणी मलाईसाठी आरोप करीत असले तर त्याला काही अर्थ नाही.

पालकमंत्रिपदाबाबत शिवसेनेने दावा सोडणे किंवा करणे हा विषय नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक आणि रायगडाच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. नाशिक आणि रायगड दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीला पालकत्व देण्यात आले आहे. त्यावरून मोठा वाद सुरू आहे.

नाशिकमध्ये भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केले होते. गिरीश महाजन यांनी कुंभ मेळा असल्याने मला मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री केले होते असा दावा केला आहे. याचाही निर्णय मुख्यमंत्रीच घेतली असे दादा भुसे यांनी सांगितले. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी कुठे जावे, कुठल्या पक्षात प्रवेश करावा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांना अधिकारही असल्याचे दादा भुसे म्हणाले. संजय राऊत रोजच काहीतरी विचित्र बोलत असतात. आपण चर्चेत राहावे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असतो. त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नसल्याचे दादा भुसे म्हणाले.

Dada Bhuse  Dhananjay Munde
Dr Shobha Bacchav Politics: मतदान केले नाही म्हणून भाजप मालेगावला शत्रू समजते काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com