Pankaja Munde Reaction On Vaidyanath Sugar Factory News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो विकला नाही तर वाचवला! पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण

Pankaja Munde On Vaidyanath Sugar Factory : एखाद्या माणसाला कॅन्सर झाला समजल्यावर आपण काय करतो? त्याला जगवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या पाण्यात आपण बुडू लागलो, कडेवर लेकरू असेल तर आपण काय करतो?

Jagdish Pansare

  1. पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या लिलावावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून “कारखाना विकला नाही, वाचवला” असं स्पष्ट सांगितलं.

  2. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुंडेंनी पलटवार करत सांगितलं की, हा निर्णय कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी होता.

  3. बीड जिल्ह्यातील या प्रकरणामुळे पुन्हा राजकीय वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathwada Political News : बीड जिल्ह्यातील शेतकरी, ऊस उत्पादकांसाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा नुकताच लिलाव झाला. यावरून मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे या बहीण-भावावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली. गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला कारखाना त्यांच्या मुलीने विकला, असा आरोप करण्यात आला.

आतापर्यंत या विषयावर शांत असलेल्या पंकजा मुंडे यांनी काल परळीतील दिवाळी स्नेह मेळाव्यात यावर भाष्य केले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा माझ्या वडीलांचा आत्मा होता, काही लोक म्हणायले, गोपीनाथ मुंडेंचा कारखाना त्यांच्या मुलीने विकला. बापाचा आत्मा कधी कोणी विकू शकतं का? कारखाना गंजून कोसळण्यापेक्षा किंवा त्याचे कुलूप गंजून पडण्यापेक्षा तो सुरू राहणं आणि या भागातील शेतकऱ्यांचा ऊस तिथे जाणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं.

एखाद्या माणसाला कॅन्सर झाला समजल्यावर आपण काय करतो? त्याला जगवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या पाण्यात आपण बुडू लागलो, कडेवर लेकरू असेल तर आपण काय करतो? त्याला खांद्यावर घेतो, त्याला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी मी केला. एखाद्या बँकेचे कर्ज आपण घेतले आणि ते फेडू शकले नाही. तर तुम्ही काय करता वसुलीसाठी? तेच वैद्यनाथच्या बाबतीत घडलं. पण काही लोक मी कारखाना विकला, असा अपप्रचार करतात. त्यांच्याशी डोकं लावण्याची गरज नाही.

राज्यातील आजारी कारखाने जगवण्यासाठी सगळ्यांना मदत मिळाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह काही कारखान्यांना पैसे मिळाले, पण माझ्या कारखान्याला नाही. शांत राहून आपले काम करा. आज कारखाना सुरू आहे, या कारखान्यात ऊस कोणाचा जाणार आहे? तुमचाच ना? यंदा वैद्यनाथ कारखान्यात सर्वाधिक ऊसाचे गाळप होणार आहे.

शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात जाणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे कोणी कितीही गोपीनाथ मुंडेंचा कारखाना मी विकला, असे म्हणत असले तरी जे झालयं ते भल्यासाठी झालं आहे.

FAQs

1. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या लिलावावर पंकजा मुंडेंनी काय म्हटलं आहे?
→ त्यांनी सांगितलं की, “कारखाना विकला नाही, वाचवला” आणि कामगारांचं नुकसान होऊ नये म्हणून निर्णय घेतला.

2. विरोधकांनी पंकजा मुंडेंवर कोणते आरोप केले होते?
→ विरोधकांनी त्यांच्यावर कारखाना विक्रीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते.

3. हा कारखाना कुठे आहे?
→ वैद्यनाथ साखर कारखाना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे.

4. धनंजय मुंडेंनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
→ त्यांनी या विषयावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

5. या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
→ पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT