Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : मी माझ्या नेत्यांना भेटणार अन्...; पंकजा मुंडेंना व्यक्त केली मनातील खदखद

Gopinath Gad : माझ्याबाबत संभ्रमाच्या वातावरणास जाबाबदार नाही

सरकारनामा ब्यूरो

Pankaja Munde will Meet Amit Shah : चार वर्षांपूर्वी मी परळीतून विधानसभा निवडणूक हारले. त्यानंतर दोन डजन आमदार, खासदार झाले. मी लोकांसाठी राजकारणात आहे. माझ्या भूमिका स्पष्ट असतात. मात्र असा काय गुन्हा केला त्यामुळे माझ्यावर वनवासात जाण्याची वेळ आली. याबाबत मी माझ्या नेत्यांना भेटणार आहे. यांना भेटून माझ्याबाबत तुमच्या मनात काय सुरू आहे, हे थेट विचारणार असल्याची स्पष्ट भूमिका भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्य स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यकर्माचे आयोजन केले होते. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी कोणत्याही कारणासाठी कुणापुढेही कधीही झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

त्या म्हणाल्या "पाच वर्षात राजकीय घटना घडल्या आहेत. भाजप पक्षासह इतर पक्षांनी घेतलेल्या भूमिकामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. कुणी कुठलीही भूमिका घेवो, मी मात्र फक्त लोकांसाठी राजकारणात आहे. मी माझ्या परिवाराचे भले करण्यासाठी नाही. माझ्या कुठल्याही आशा, आकांक्षा नाहीत. लोकांचे भले करण्याच्या माझ्या भूमिकेत कुणी आडकाठी आणत असेल तर त्याविरोधात बोलण्याचे धाडस मुंडेसाहेबांनी दिले आहे."

यावेळी मुंडे यांनी भाजप नेत्यांना टोलेही लागावले. त्या म्हणाल्या, "या गोपीनाथ मुंडे यांनी समाजहिताच्या भूमिका घेतल्यानेच लोकनेते झाले. कुणाला आवडेल असे काहीजण निर्णय घेतात. ते एखाद्यावेळी आमदार, खासदार, राज्यमंत्री, मंत्री होतील मात्र लोकनेते होणार नाहीत. मला हे सगळे नाही मिळाले. मला पराभव स्वीकारावा लागला. मला सहज काही मिळाले नाही. आता मी काय भूमिका घ्यायला पाहिजे? कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवण्याएवढे मजबूत खांदे मला मिळालेले नाहीत. मात्र माझ्या खांद्यावर अनेक जण बंदुका विसावत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही."

आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. या परिस्थितीला मी जबाबदार नसल्याचेही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोक निवडणुका हरले पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या चार वर्षात कदाचित दोन डजन खासदार, आमदार झालेत. त्यात मी मात्र बसत नसेल. त्यामुळे लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढावलेली नाही."

यावेळी पंकजा मुंडे यांनी अमित शाह (Amit Shah) यांना भेटून पक्षनेतृत्वाच्या मनात काय सुरू आहे, याबाबत जाणून घेणार असल्याचेही स्पष्ट केले. मुंडे म्हणाल्या, आता माझा पिता नाही. त्यामुळे मनातील खंत माझा नेता अमित शाह यांना भेटून व्यक्त करणार आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे की माझ्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? माझ्याबाबत स्पष्टता आल्याशिवाय मला पुढे लोकांना विश्वास देता येणार नाही. त्यानंतर काय होईल, त्याबाबतही असेच जाहीरपणे सांगेन."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT