Pankaja Munde on BJP: लहानांकडून काय अपेक्षा करणार..? पंकजा मुंडेंचा टोला कुणाला

Parali News: मी राजकारणात आले ते लोकांचं भलं करण्यासाठी आले.
Pankaja Munde on BJP:
Pankaja Munde on BJP:Sarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde on Parali: माझी भूमिका लेचीपेची नाही, मी वादळाची लेक आहे. मला भूमिका घ्यायचीच असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला बोलवेल, तुमच्याशी बोलून, चर्चा करुन भूमिका घेईल. भूमिका घेताना तु्म्हा मी सर्वांना बोलवेल आणि छातीठोक भूमिका घेईल. तुमचं प्रेम, दशा आणि दिशा माझं राजकारण ठरवणार, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या गोपीनाथ गडावर बोलत होत्या.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, अनेकांनी माझ्या खांद्यावर बंदूका ठेवल्या, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भूमिका घेण्याइतका खंबीर खांदा अजून तरी मला मिळाला नाही. मी रडत बसणारी नाही. बाप गेला तरी डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माझे नेता आहेत.मी अमित शहांना भेटेन, त्यांच्यांशी बोलेन, मी लहान माणसांकडून काय अपेक्षा करु. मला कुणाकडून काही अपेक्षा नाही. असही त्यांनी यावेळी म्हटलं. असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला.

Pankaja Munde on BJP:
Ahmednagar Politics : जोर्वे नाका घटनेकडे राजकीय हेतूने बघू नये; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे?

मला स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा पाहिजे आणि तु माझा प्रचार कर असं मला मुंडे साहेबांनी सांगितलं. त्यांच्या सांगण्यानुसार मी 2004ला मुंडे साहेबांचा प्रचार केला. तेव्हापासून आजपर्यंत मी सार्वजनिक जीवनात आहे. त्यांनी गरीबांची, वचिंताची भूमिका मांडली. मी राजकारणात आले ते लोकांचं भलं करण्यासाठी आले. पण प्रत्येकवेळी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जातो. राजकारणात कधीकधी किर्तन केलं पाहिजे. यातून पाच वर्षात अनेक लोक आले. (Marathwada Politics)

मी माझी भूमिका हजार वेळा मांडली आहे. माझे शब्द ठाम आहेत. माझ्या डाव्या बाजूला कमळाची आकृती आहे आणि त्यात माझे पिता विसावले आहे. आयुष्यात कधीच सत्तेच स्वप्न बघू शकत नाहीत अशा पक्षात माझ्या वडीलांनी सुरुवात केली. त्या पक्षाला यशाच्या शिखरापर्यंत पोहचवलं. त्या गोपीनाथ मुंडेंची मी कन्या आहे. त्यांनी मला राजकारणात आणलं. (Pankaja Munde News)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com