Parbhani Hingoli MLC Election | Mahayuti Candidate Race Sarkarnama
मराठवाडा

MLC Election 2026 : परभणी- हिंगोलीची जागा कोण लढवणार? इच्छुकांच्या अर्ज करण्यासाठी पहिल्याच दिवशी उड्या!

Parbhani Hingoli MLC Election : पहिल्याच दिवशी अर्ज खरेदीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्या दिवशी 19 अर्ज या विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून घेण्यात आले. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे भाजपने या जागेवर दावा केला आहे.

Jagdish Pansare

Parbhani News, 26 May : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज विक्री प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून कोण किती जागा लढवणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची गर्दी मात्र प्रचंड आहे.

पहिल्याच दिवशी अर्ज खरेदीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्या दिवशी 19 अर्ज या विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून घेण्यात आले. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे भाजपने या जागेवर दावा केला आहे.

शिवसेनेचे विप्लव बजोरिया हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. 21 जून रोजी त्यांची मुदत संपत आहे. 18 जूनला विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. गेल्यावेळी आमदार असलेल्या बाजोरिया यांना पक्षाने पुन्हा तयारीला लागा असे आदेश दिल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे.

मात्र स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष महायुतीमध्ये सुरू झाल्यामुळे बजोरिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा दावा असलेल्या परभणी- हिंगोली या मतदार संघातून भाजपचे संतोष मुरकुटे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर प्रताप देशमुख हे इच्छुक असल्याचे समजते.

महाविकास आघाडीकडून शिवसेना, काँग्रेस या दोन पक्षात इच्छुकांची गर्दी अधिक दिसते. शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा पाहता त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT