Nashik Fake Baba : प्रसाद म्हणून दारू दिली, दोन एकर जमीन नावावर करुन घेतली ; नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचे धक्कादायक कारनामे

Nashik Crime News : भोंदूबाबा कमलेश अधिकारी व त्याच्या साथीदार पत्नीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Kamlesh Adhikari,
Kamlesh Adhikari,Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातचे प्रकरण समोर आले अन् त्यानंतर जणू या भोंदूबाबांची रांगच लागली. भोंदूगिरीच्या वारळातून एक-एक भोंदू बाबा बाहेर येत असून त्यांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होत आहे. नाशिकमध्ये आता आणखी एका भोंदूबाबाचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत.

नाशिक शहरासह परिसरात आश्रम व मठ स्थापन करून विविध समस्यांनी पीडिलेल्या व्यक्तींचे स्मशानात अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त उपाय करून विविध प्रकारचे शोषण करणाऱ्या कमलेश महाराज अधिकारी या भोंदूबाबा व त्याच्या साथीदार पत्नीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अंनिसच्या प्रयत्नातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरासह परिसरात आश्रम व मठ स्थापन करून विविध समस्यांनी पीडिलेल्या व्यक्तींचे स्मशानात अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त उपाय करून विविध प्रकारचे शोषण करणाऱ्या कमलेश महाराज अधिकारी या भोंदूबाबा व त्याच्या साथीदार पत्नीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अंनिसच्या प्रयत्नातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kamlesh Adhikari,
Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन नवनाथ देवकर व ज्ञानेश्वर नवनाथ देवकर या दोन पीडित भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये एका महिनाभराच्या अंतराने निधन झाले. या निधनामुळे ते दोघे भाऊ भीतीत आयुष्य जगत होते. ते यावर उपाय म्हणून दैवी तोडगे, उपाय करणाऱ्यांचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना यू ट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटा जवळील खंडोबानगर येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली.

नाशिकला येऊन त्यांनी या भोंदूबाबाची भेट घेतली. कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे व ते राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आहे. त्या जमिनीत असलेला गुप्तधनाचा साठा व त्याच्यावर असलेले अतृप्त आत्मे यांनीच आई-वडिलांचा बळी घेतला व तुम्हा दोघांना लवकरच मृत्यूयोग आहे अशी भीती भोंदूबाबने घातली.

भोंदूबाबाने लगेच दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांच्या मनाचा कथित ताबा मिळविला. पुढे दोघा भावांना भुलथापा मारून उज्जैन या ठिकाणी बोलविले. तिथे स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करत विविध पशूंचा बळी देण्यात आला. दैवी पूजेच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळले. काही दिवसांनंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा केली त्यात विविध पशूंचा बळी देण्यात आला व प्रसाद म्हणून दारू दिली.

त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे त्यांना आश्रमात बळजबरीने ठेवून घेतले. त्यांच्याकडून घरगुती कामही करून घेतले. त्यांना लालूच, भीती दाखवून त्यांचे विविध प्रकारे शोषण केले. तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतली. विशेष म्हणजे भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी याच्या भोंदूगिरीमध्ये त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Kamlesh Adhikari,
Nashik By Election : नाशिकच्या मनमाड नगपरिषदेच्या तसेच पेठ, देवळा नगरपंचायतीच्या 4 रिक्त जागांसाठी 20 जूनला पोटनिवडणूक

सोलापूरच्या या दोन पीडितांनी नाशिक येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि हा भोंदूगिरीचा प्रकार समोर आला. कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले . प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना पीडितांनी आपबिती ऐकवली .त्यानंतर कारंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन भोंदू कमलेश अधिकारी, त्याची पत्नी विरोधात जादूटोणा विरोधी कायदयाचे २ (१) ख व बी.एन.एस चे ३१६(२) , ३१८ (२) , १२७(२),१२८, ११५(२),३५१(२),६१,३(५) नुसार गुन्हा दाखल केला.

याप्रकरणात अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड.बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, ॲड. सुशीलकुमार इंदवे आदींनी पीडितांना धीर देऊन, त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचवले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहे. या संदर्भात अजून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी अंनिसशी अथवा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com