Rajesh Vitekar Meets Saeed Khan sarkarnama
मराठवाडा

MLC Election : धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात महायुतीसाठी गुड न्यूज! राजेश विटेकर-सईद खान यांच्यातील वादावर पडदा

Rajesh Vitekar Meets Saeed Khan Before MLC Poll : 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार राजेश विटेकर आणि शिवसेना नेते सईद खान यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकीतून दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे दिसून आले होते.

Jagdish Pansare

Mahayuti Politics : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येत आहे तशा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. मराठवाड्यातील परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर सुरुवातीला दावा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांच्या नाराजीमुळे महायुतीत चिंतेचे वातावरण होते. संख्याबळाचा दाखला आणि परभणी जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला ही जागा न सुटता ती शिवसेनेला गेली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात मोठी अस्वस्थता जाणवत होती. तर महायुतीचे उमेदवार सईद खान यांना दगा फटका होतो की काय? अशी भीती स्थानिक नेत्यांमध्ये होती.

गेल्या अनेक दिवसांपासून सईद खान यांच्या उमेदवारीमुळे राजेश विटेकर आणि भाजपचे काही स्थानिक नेते पदाधिकारी हे नाराज असल्याचे बोलले जात होते. यातून महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नावंदर यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आज पाथरी येथे अधिक मासानिमित्त आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात आमदार राजेश विटेकर आणि महायुतीचे परभणी हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार सईद खान यांच्यात अखेर मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला, हास्यविनोदही केला हे चित्र आणि त्यांची देहबोली पाहून दोघांच्या समर्थकांना हायसे वाटले.

राजेश विटेकर यांची नाराजी खरंच दूर झाली का? हे विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर स्पष्ट होईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार राजेश विटेकर आणि शिवसेना नेते सईद खान यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकीतून दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे दिसून आले होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आमदार विटेकर कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

महायुतीच्या जागावाटपात परभणी हिंगोलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर अल्पसंख्याक तरुण चेहरा असलेले सईद खान यांची उमेदवारी निश्चित झाली. मात्र या निर्णयाबाबत विटेकर नाराज असल्याच्या चर्चा उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत सुरू होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे महायुतीतील सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.

दरम्यान बुधवारी झालेल्या धोंडे जेवणात शिवसेनेचे उमेदवार सईद खान आणि आमदार राजेश विटेकर यांच्यात झालेला सुसंवाद व विटेकरांनी सईद खान यांच्या विजयासाठी केलेले आवाहन यामुळे अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये झालेला संवाद तसेच त्यांच्या देहबोलीतून दिसलेला स्नेह यामुळे जुने राजकीय मतभेद मागे पडल्याचे चित्र दिसून आले.

या भेटीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 131 संख्याबळ असून त्यामुळे विटेकरांचा भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत धोंडेजेवणाच्या निमित्ताने झालेली भेट आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आमदार विटेकरांनी केलेले आवाहन हे सईद खान यांच्यासाठी मोठे बळ मानले जात आहे.

विटा (खु) येथे बुधवार 10 जुन रोजी आयोजीत कार्यक्रमाला कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार सईद खान, संपर्कप्रमुख आनंद जाधव, नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्य उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT