

Solapur, 11 June : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूरमध्ये जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपला आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. कारण पक्षाच्या चारपैकी तीन आमदारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आहे, त्यामुळे हे तीन नेते विधान परिषद निवडणुकीत भाजपसोबत जाणार हे आता उघड गुपित बनले आहे. या बैठकीत ते महायुतीच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होत आहे. या बैठकीला भाजप आमदार, नेतेमंडळींसह महाविकास आघाडीतील आमदार आणि नेतेही उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन आमदार महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत, त्यात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा समावेश आहे.
याच बैठकीला महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार धनाजी साठेही उपस्थित आहेत, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
दरम्यान, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्यात बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. याचबरोबरच पाटील आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरायला उपस्थित होते.
आमदार अभिजीत पाटील आणि उत्तम जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारी नाराज आहेत, त्यामुळे खुद्द पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची सोलापूरमध्ये बैठक होत आहे. त्या बैठकीला पवारांच्या तीन आमदारांनी हजेरी लावली आहे. त्यासोबतच शेकाप आणि काँग्रेसचे आजी-माजी आमदारही उपस्थित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.