Parbhani Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha News : परभणीत महायुतीचा उमेदवार कोणीही असो, चिन्ह मात्र कमळच...?

NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने परभणी लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : राज्यातील महायुती सरकारचे घटक पक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Mahayuti News) दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्ही आमच्याच चिन्हावर लढणार असे छातीठोकपणे सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याची चर्चा सध्या परभणी लोकसभा मतदारसंघात होतांना दिसते आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोणीही असो, निवडणुकीचे चिन्ह मात्र कमळच असेल, असा दावा केला जातोय. (Parbhani) लोकसभा निवडणुकीला जेमतेम दोन महिन्याचा कालावधी उरला असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जागावाटपाचा घोळ अजूनही कायम आहे. शिवसेना व भाजप (BJP) युती असताना परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असायचा. मतदारसंघातील जनतेनेही कायम शिवसेनेची साथ देत खासदार निवडून दिले.

यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असणार आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात रस्सीखेच सुरु आहे. (NCP) भारतीय जनता पक्षाने चारही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन बुथ स्तरापर्यंत तयारी सुरु केली आहे. लोकसभा समन्वयक म्हणून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची नियुक्ती केली असून बोर्डीकर हे सर्वात प्रबळ दावेदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या विविध बैठकांमध्ये वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करताना आपलाच उमेदवार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तसेच जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ अन्य पक्षाकडे गेला तरीही निवडणूक चिन्ह कमळ हेच असेल असेही सांगण्यात येत आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. राजेश विटेकर हे अजित पवार गटात आहेत.

त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे असावा यासाठी स्वतः अजित पवार आग्रही आहेत. पक्षाच्या कर्जत येथील बैठकीत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी यासंबंधी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान मतदारसंघासह ज्या ठिकाणी पक्षाची क्षमता आहे त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे केले जातील. तसेच अन्य ठिकाणी बोलताना पवार यांनी असेही सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अन्य कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढणार नसून केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणी लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे. परभणीच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीवर सदस्य निवडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

असे झाले तर राजेश विटेकर हेच उमेदवार निश्चित मानले जात आहेत. मात्र जागावाटपाचा पेच आणि त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कमळ चिन्ह असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा होऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT