NCP State President : अजितदादांची इच्छा असेल तरच मी प्रदेशाध्यक्ष होतो; जयंतरावांनी पवारांपुढे ठेवली होती अट

Pawar-Patil News : त्या वेळीही मी आणि अजित पवार आम्ही दोघांनी बसून उमेदवारीची तिकिटे फायनल केली.
Sharad Pawar-Jayant Patil-Ajit Pawar
Sharad Pawar-Jayant Patil-Ajit PawarSarkarnama

Mumbai News : अजित पवार यांच्याशी माझा कधीही संघर्ष झाला नाही किंवा क्रॉस करण्याचा कधी विषय झाला नाही. त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा तर प्रश्नच आला नाही. कारण ते पवारसाहेबांच्या घरातीलच आहेत. मी जेव्हा 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो, तेव्हा ‘पहिलं अजितदादांना विचारा. त्यांची इच्छा असेल तरच मी प्रदेशाध्यक्ष होतो. नाही तर मी होणार नाही. त्यांची इच्छा नसेल तर दुसरं कोणालाही करा, मला काहीही प्रॉब्लेम नाही, असं मी शरद पवार यांना सांगितले होते, अशी आठवण आमदार जयंत पाटील यांनी सांगितली. (I was state president only if Ajit Pawar wanted : Jayant Patil)

खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जयंत पाटील अनेक अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की माझा अजितदादांशी कधीही संघर्ष झाला नाही. उलट (स्व.) आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करताना माझं आणि अजितदादांचं एकमत असायचं. मंत्रिमंडळात बऱ्याचदा आमच्या दोघांमध्ये एकमत व्हायचं. आमच्यात मतभेद होण्याचा प्रश्नच कधी आला नाही. अजितदादांशी स्पर्धा करण्याचा कधी प्रश्नच आला नाही. कारण ते पवारसाहेबांच्या घरातीलच आहेत. स्पर्धा करावी, अशा इच्छाही कधी माझ्या मनात आलेली नाही. मला जी जबाबदारी देण्यात आली, ती मी व्यवस्थित पार पाडली, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Jayant Patil-Ajit Pawar
Ajitdada Vs Jayantrao : होय, मला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं; पण अजितदादांनी... : जयंतरावांचं ‘त्या’ वादावर भाष्य

जयंत पाटील म्हणाले की, पवारसाहेबांनी त्या वेळी सांगितले होते की, होय...माझं अजित पवारांशी बोलणं झालं आहे. मी सगळ्यांशी बोललो आहे आणि तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष करण्यावर सगळ्यांचं एकमत झाले आहे. पवारांनी हे सर्व सांगितल्यावरच मी २०१८ मध्ये मी राष्ट्रवादीचा राज्याचा अध्यक्ष झालो.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्या वेळी म्हणजे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे सर्वांत कमी म्हणजे ४० किंवा ४१ आमदार निवडून आले होते. काँग्रेसचेही तेवढेच लोक निवडून आले होते. शिवसेना-भाजप युतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले होते. त्या वेळी अजितदादा हे पक्षनेते होते. माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी २०१८ मध्ये टाकली. त्यावेळी भाजप संपूर्ण ताकद लावून काम करत होता. ज्या वेळी कोणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं, तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्या वेळी मला प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छाही नव्हती. पण साहेबांनी आदेश दिल्यावर मी प्रदेशाध्यक्ष झालो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Jayant Patil-Ajit Pawar
Shivsena Convention : शिवसेना नाशिकमधून फुंकणार लोकसभेचे रणशिंग; 28 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होणार

आमदार पाटील म्हणाले की, पुण्यात राष्ट्रवादीची सभा झाली. सगळ्यांसमोर मतदान झाले आणि त्यानंतर माझी निवड झाली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्या वेळीही मी आणि अजित पवार आम्ही दोघांनी बसून उमेदवारीची तिकिटे फायनल केली. सर्व्हेक्षण केल्यानंतर मी जे त्यांच्यासमोर ठेवायचो, तेव्हा त्यांनी कधीही नकार दिला नाही. योग्य आहे, ते करायला त्यांनी कधीही नकार दिलेला नाही, हे मला मान्य करावेच लागेल.

कधी कधी अजित पवार माझ्यावर चिडायचे

अजित पवार आणि माझं ट्युनिंग फार व्यवस्थित होतं. त्यामुळे मी एखादी गोष्ट करता येणार नाही, असे अजितदादांना सांगायचो. कधी कधी ते माझ्यावर चिडायचे. मी काय सांगतो, तुम्ही काहीच करत नाही, असे ते म्हणयाचे. खरं ते सांगितल्यावर कालांतराने ते त्यांच्या लक्षात यायचं. अजितदादा आणि पवारसाहेब यांच्यापासून मी कोणतीही गोष्ट दडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे माझ्यात आणि अजितदादांमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Sharad Pawar-Jayant Patil-Ajit Pawar
Kalaben Delkar Meet Modi : ठाकरेंना मोठा धक्का; ज्यांच्यासाठी भाजपबरोबर पंगा घेतला तेच खासदार पक्ष सोडणार?

तिकिटं बदलाची परवानगी घेतली

विधानसभा निवडणुकीवेळी एक दोन ठिकाणी तिकिट बदलण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी फोन करून जयंतराव, ही तिकिटं बदलली तर चालतील का, अशी माझ्याकडे विचारणा केली होती. आता त्यांच्या मनात काय आहे, ते मला माहिती नव्हतं.

त्या सोहळ्यातच राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता

पहाटेच्या शपथविधीनंतर पवारसाहेबांनी मला अजितदादांना जाऊन भेटा आणि परत आलं पाहिजे, असा निरोप द्या, असे सांगितले होते. तेही काम मी केले. ते परत आले, सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महिना ते दीड महिन्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळीही मी आक्षेप घेतला नाही. शिवाजी पार्कच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, तर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा व्हायला पाहिजे होता. पण त्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळी आम्ही कोणीही आक्षेप घेतला नाही.

Edited By : Vijay Dudhale

Sharad Pawar-Jayant Patil-Ajit Pawar
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com