Uddhav Thackeray, Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav News: परभणीच्या खासदारांचा 'जय महाराष्ट्र' पक्काच, पण जायचं कुठं भाजप की शिंदेंची शिवसेना..? संजय जाधवांना मोलाचा सल्ला

Marathwada Politics: गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईत मातोश्री आणि शिवसेना भवनात बोलावलेल्या दोन बैठकांना गैरहजर राहत त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

Jagdish Pansare

Parbhani Politics: परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा पक्षांतराचा निर्णय पक्का झाला आहे. फक्त प्रवेश शिवसेनेत घ्यायचा, की भाजपामध्ये? यावर त्यांचे एकमत होत नाहीये. पण त्यांनी आता अधिक उशीर लावू नये, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा लोक कंटाळतील, असा सल्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांना दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईत मातोश्री आणि शिवसेना भवनात बोलावलेल्या दोन बैठकांना गैरहजर राहत त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी गेल्या आठवड्यात परभणी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा दौरा करत या पक्षांतराचा आढावा घेतला होता.

दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात संजय जाधव यांनी जाहीरपणे आपल्या पक्षांतराच्या निर्णयाला हवा देणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाधव समर्थक जिल्हाप्रमुखाला हटवत जाधव यांना दणका दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनीही आता खासदार संजय जाधव यांना थेट पक्ष बदलाबाबतचा निर्णय लवकर घ्या, असे आवाहन केले.

भाजपामध्ये प्रवेश करायचा, की शिंदेंच्या शिवसेनेत? हा त्यांचा निर्णय आहे. पण आता वेळ घालवू नका. काल तुम्ही एका भाषणात राजकारण पैशाचे झाले आहे, असे चुकीचे म्हणालात. राजकारण पैशाचे नाही तर विकासाचे होत आहे. तुम्ही बारा वर्षापासून खासदार आहात, पण या काळात आपल्याकडून काहीच विकास कामे झाली नाहीत, याची जाणीव तुम्हाला होऊ लागली आहे.

विकास करायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, हे जाधव यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लवकर घेतील, असा दावाही भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे होत आहेत. तेव्हा उशीर नको, निर्णय घ्या, अन्यथा जनता कंटाळून जाईल, असा सल्ला भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT