

TMC vs BJP results : पश्चिम बंगालमध्ये मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांना यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त हादरा बसण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार करत राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसला अद्याप शंभरचा आकडाही पार करता आलेला नाही. राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना ममतांनी कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत संदेश देताना आपलाच विजय होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने कालपासूनच वातावरणनिर्मिती सुरू केली होती की, ते सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर राहतील. जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
अनेक मतदारसंघातील मतमोजणी जाणीवपूर्वक थांबविली गेली. कल्याणी येथे अशा मशीन सापडल्या असून त्यांचा ताळमेळ लागत नाही. भाजपच्या या प्लॅनला घारबण्याची गरज नाही. कारण खरे निकाल संध्याकाळपर्यंत येतील, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ममतांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोग त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करत आहे. केंद्रीय सुरक्षा दल कायद्याविरोधात जात टीएमसी कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहे. पोलीस त्यांच्यासोबत मिळून काम करत आहेत. टीएमसी अनेक मतदारसंघात पुढे आहे. पण मीडिया आणि इतर रिपोर्ट चुकीच्या पध्दतीने दाखविले जात आहेत, असा दावाही ममतांनी केला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत ममतादीदी म्हणाल्या, निराश होण्याची अजिबात गरज नाही. एकही एजंट मतमोजणी केंद्रातून बाहेर जाणार नाही. विजय आणि पराभवाचा निर्णय अखेरच्या फेरीनंतर होतो. अजूनही खूप काही बाकी आहे. निकाल नक्कीच बदलेल. टीएमसीकडे अजूनही आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे सर्व एजंट सतर्क राहून लक्ष देतील, असा विश्वास ममतादीदींनी व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी (दुपारी १.४५ वाजता)
पश्चिम बंगाल - एकूण - २९४, कल - २९१
भाजप - १९४
तृणमूल काँग्रेस - ९२
इतर - ५
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.