Parbhani ZP Election News : परभणी जिल्हा परिषदेत भाजपाकडे स्वतःचे उमेदवार नाहीत, त्यांनी आपले बी फाॅर्म गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या चरणी नेऊन ठेवले, असा आरोप पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर खासदार संजय जाधव यांच्याकडून सातत्याने करण्यात आले. परंतु आज निकाल लागला तेव्हा भाजपाने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. सर्वाधिक 24 जागा जिंकत भाजपने मोठा भाऊ होण्याचा मान परभणीत पटकावला आहे.
सत्तेसाठीचे मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपला मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचा दावा करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मात्र मोठा दणका बसला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनूसार या पक्षाला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. राज्याच्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 15 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तर पाच जागांसह शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पक्षाने तीन जागा जिंकल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती. भाजपा पक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांना सरेंडर झाला, अशी टीका विरोधकांकडून केली गेली. भाजपने अकरा बी फाॅर्म गुट्टे यांना देऊन त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावर उभे केले.
जगातला सगळ्यात मोठा पक्ष पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, अशी टीका मेघना बोर्डीकर यांना सहन करावी लागली. खासदार संजय जाधव यांनी आमच्या पक्षात जास्त लक्ष घालू नये, मी जे करत आहे ते पक्षाच्या आदेशानूसार करत आहे, असा पलटवार बोर्डीकर यांनी केला होता. भाजपची रणनिती आता यशस्वी होताना दिसतं आहे. जिल्हा परिषदेत गेल्या वेळच्या पाच जागांवरून भाजपने थेट 24 जागांवर मुसंडी मारली आहे. भाजपच्या या यशाचे श्रेय मेघना बोर्डीकर यांच्यासह आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जाते.
भाजप : 24
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 06
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 15
काँग्रेस : 03
वंचित : 00
एमआयएम: 00
अपक्ष-1
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.