ZP Election Results 2026 : निकाल जाहीर होण्याआधीच झेडपी आणि पंचायत समितीच्या 'या' 27 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra ZP, Panchayat Samiti Results 2026 : जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Shiv Sena leader Sanjay Shirsat addresses the media while responding to CM Devendra Fadnavis’ saffron pride statement during civic election campaigning.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra ZP Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज (ता. 09) जाहीर होणार आहे. या निकालाकडे उमेदवारांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणता पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तर दुसरीकडे 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कोकणात महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ichalkaranji Mayor Election : इचलकरंजी महापौर-उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम चुकीचा? फेरनिवडणूक राबवावी लागण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे 2 सदस्य बिनविरोध विजयी झालेत. त्यामुळे कोकणातून महायुतीच्या 27 उमेदवारांनी मतमोजणीआधीच गुलालाची उधळण केली आहे.

बिनविरोध विजयी उमेदवारांची यादी-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद -

बिनविरोध भाजप उमेदवार - प्राची इस्वालकर, प्रमोद कामत, सुयोगी रविंद्र घाडी, अवनी अमोल तेली, अनुराधा महेश नारकर,सावी गंगाराम लोके, प्रमोद पुंडलिक रावराणे

बिनविरोध शिवसेना उमेदवार - रुहिता तांबे

कणकवली पंचायत समिती -

बिनविरोध भाजप उमेदवार - सोनू सावंत, हर्षदा हनुमंत वाळके, महेश्वरी महेश चव्हाण, संजना संतोष राणे, दिव्या दिनकर पेडणेकर, सायली संजय कृपाळ.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
BMC Mayor election: ठाकरेसेनेची 'मनसे' खदखद बाहेर; भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार?

देवगड पंचायत समिती

बिनविरोध भाजप उमेदवार - अंकुश यशवंत ठूकरूल, गणेश सदाशिव राणे, संजना संजय लाड, समृद्धी संतोष चव्हाण, शितल सुरेश तावडे, ऋतुजा राकेश खाजनवाडकर

वैभववाडी पंचायत समिती - साधना नकाशे (भाजप)

वेंगुर्ले पंचायत समिती - संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती - सीमा सतीश परुळेकर (भाजप)

सावंतवाडी - महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती - गणेश प्रसाद गवस (शिवसेना)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com