Parbhani Politics News : परभणी जिल्ह्याच्या राजकारणात पाथरीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील संघर्ष भडकला आहे. पाथरी नगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्यानंतर सईद खान यांनी बाबाजानी यांच्याभोवती फास आवळायला सुरूवात केली आहे.
पाथरी नगरपरिषदेची सत्ता पस्तीस वर्ष हातात असताना बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा भ्रष्टाचार केला. सरकारी, नगरपालिकेच्या मालकीच्या जागांवर अतिक्रमणे केली, तिथे मोठी टाॅवर उभारून कोट्यावधीचा गैरव्यवहार केला. पण त्यांच्या या सगळ्या भ्रष्ट कारभाराला आता लगाम घालून बाबाजानी यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या काही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई लवकरच नगरविकास विभागाकडून केली जाणार असल्याचा दावा सईद खान यांनी केला आहे.
बाबाजानी दुर्राणी यांनी बेकायदेशीरपणे उभारलेल्या हमीदा आणि बाबा टाॅवरची चौकशी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानूसार लवकरच जिल्हाधिकारी बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या काही नगरसेवकांना घरी जावे लागणार आहे.
पाथरी नगरपालिकेतील सत्तेचा दुरुपयोग करत बाबाजानी आणि त्यांच्या नगरसेवकांनी खोट्या रजिस्ट्री करून दिल्या आहेत, असा आरोप सईद खान यांनी केला. पस्तीस वर्षाची नगरपालिकेची सत्ता बाबाजानी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुटुंबासाठी वापरली. पत्नीच्या नावे उभारलेले हमीदा टॉवर, बाबा टाॅवर हे शासकीय जागेवर उभारण्यात आले आहे. अनेक ओपन स्पेस, खाजगी लोकांच्या जागा त्यांनी बळकावल्या. ही सगळी प्रकरण आता आम्ही बाहेर काढली आहेत.
या सगळ्या प्रकरणात कारवाई होऊन लवकरच बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या पक्षाचे काही नगरसेवक जेलमध्ये जातील, असा दावाही सईद खान यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या फाईल या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत, असेही सईद खान यांनी सांगीतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.