बाबाजानी दुर्राणींना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर ठेवण्यात आले होते.
त्यानंतर दुर्राणींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता शिवसेनेला सोबत घेत सभापतीविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करून राजकीय पलटवार केला.
या घडामोडीमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये संघर्ष उडाला आहे. महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
Marathwada Political News : पाथरीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाबाजीनी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगला दणका दिला. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून दुर्राणी यांनी त्यांना घरी बसवले आहे. विशेष म्हणजे अविश्वास प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी बाबाजीनी यांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मदत घेतली. राष्ट्रवादीचे सभापती अनिल नखाते यांच्याविरोधातील अविश्वासठरावर 5 विरुद्ध तेरा मतांनी समंत झाला आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर युती-आघाडीसाठी हालचाली सुरू आहेत. तर काही पक्षांनी स्वबळाचा नारा देत स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. त्याआधीच काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेशी युती करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीला पायउतार व्हायला भाग पाडले. या नव्या युतीची परभणी जिल्ह्यात चर्चा होत आहे. पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर ठेवणाऱ्या अजित पवारांना दुर्राणी यांनी अशा पद्धतीने धडा शिकवल्याचे बोलले जाते.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा सदस्य शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पाच सदस्य अजित पवार गटासोबत तर सात सदस्य हे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत राहिले. अजित पवार गटात जाणाऱ्या त्या पाच सदस्यांमध्ये सभापती अनिल नखाते यांचा समावेश होता. दुर्राणी यांनी नखाते यांच्याविरोधात याआधीही अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, तेव्हा शिवसेना शिंदे गट मदतीला धावून आला होता. त्यामुळे अनिल नखाते यांचे सभापतीपद वाचले होते.
आता त्याच शिवसेनेच्या सदस्यांना सोबत घेत दुर्राणी यांनी गेल्यावेळी फसलेला डाव यावेळी यशस्वी करून दाखवला. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या सात आणि शिवसेना शिंदे गटाच्या सहा संचालकांनी सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या अनुषंगाने आज पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात 5 विरुद्ध 13 मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. काँग्रेसने थेट शिवसेना शिंदे गटासोबत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये युती केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस एकत्र आले असले तरी काँग्रेससोबत जाणारे शिवसेनेचे संचालक आम्ही शिवसेनेतच आहोत, असे ठामपणे सांगत आहेत.
1. बाबाजानी दुर्राणींनी कोणाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला?
→ राष्ट्रवादी काँग्रेसच्या भापतीविरुद्ध त्यांनी शिवसेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे.
2. अजित पवारांनी दुर्राणींना पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर का ठेवले?
→ अंतर्गत राजकीय गणित आणि स्थानिक समीकरणांमुळे अजित पवारांनी तातडीने निर्णय घेतला नाही.
3. शिवसेनेने बाबाजानींना का साथ दिली?
→ स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीविरोधी मत तयार करण्यासाठी शिवसेनेने ही संधी साधली.
4. या घटनाक्रमाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो?
→ पक्षातील असंतोष वाढण्याची शक्यता असून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
5. परभणी जिल्ह्यात पुढील राजकीय समीकरणे कशी बदलू शकतात?
→ दुर्राणी आणि शिवसेना युतीमुळे स्थानिक सत्तेसाठी नवे गठबंधन तयार होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.