Sudhir Mungantiwar News: सुधीर मुनगंटीवार 12 वर्षांनंतर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये: 40 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अधिकाऱ्याविरोधात दिली तक्रार

Ramnagar police station Chandrapur : दोन दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूरला भेट देऊन संबंधित वॉशरीची पाहणी केली. त्यावेळी प्रदूषणाची तीव्रता लक्षात आल्यानंतर मुनगंटीवार यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
Sudhir Mungantiwar Chandrapur
Sudhir Mungantiwar ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव अडचणीत सापडले आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर भाजप नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन यादव यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच एखाद्या अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत धाव घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तानाजी यादव यापूर्वीही अनेक प्रकरणांत वादग्रस्त ठरले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी येथे महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी २०२४ पासून कोळसा वॉशरी सुरू केली आहे. या वॉशरीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून परिसरातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काही जनावरांचा मृत्यू झाल्याच्याही तक्रारी आहेत.

या प्रकरणी मुनगंटीवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शेतपीक नुकसानभरपाई समिती नेमली. समितीने पंचनामा करून सुमारे 68 लाख 61 हजार 864 रुपयांची नुकसानभरपाई संबंधित कंपनीकडून वसूल करून शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. ही वसुली करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्यावर होती.

याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यादव यांनी कर्तव्य जाणीवपूर्वक पार पाडले नाही व दोषींना अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 198, 218, 271 आणि 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

Sudhir Mungantiwar Chandrapur
Baramati Election Sabha: CM फडणवीसांची तोफ सात वर्षांनंतर बारामतीत धडाडली; अजितदादांच्या अपघाती निधनाबाबत केलं मोठं विधानं

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूरला भेट देऊन संबंधित वॉशरीची पाहणी केली. त्यावेळी प्रदूषणाची तीव्रता लक्षात आल्यानंतर मुनगंटीवार यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार असीफ रजा यांनी मुनगंटीवार यांची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी महापौर संगीता खांडेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायद्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिलीच पाहिजे. अन्यथा संबंधित कोल वॉशरीवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार एमपीसीबी अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, यादव यांनी ते केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली आहे. -सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com