Praful Patel_Satish Chavan_Sunetra Pawar 
मराठवाडा

Praful Patel: विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर प्रफुल पटेलांचा संताप; पक्ष नेतृत्वालाच दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला

Praful Patel spoke on MLC Election: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

Amit Ujagare

Praful Patel spoke on MLC Election: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा आणि विद्यमान आमदाराचा पराभव झाला आहे. चव्हाण यांच्याविरोधात मराठवाड्यात शिवसेनेत मोठी नाराजी होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीतूनही त्यांना विरोध असल्याची चर्चा होती. पण तरीही पक्षानं उमेदवारी दिल्यानं त्याचा फटका मराठवाड्यातील एकमेव आमदारकीची जागा गमावण्यात झाली. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळंच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी संताप व्यक्त करत पक्ष नेतृत्वालाच आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे.

प्रफुल पटेल यांनी म्हटलं की, "आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल"

दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यात शिवसेनेचे आमदार अब्दुल्ल सत्तार, संजय शिरसाट यांनी थेटच विरोध केला होता. त्यामुळं त्यांनी या आमदारांच्या प्रचारातही सहभाग नोंदवला नाही. त्यामुळं महायुतीतील मित्रपक्षांचा रोष ओढवून घेणं राष्ट्रवादी काँग्रेसला परवडलं नाही, त्यामुळंच चव्हाण यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे.

त्यातच कृषी उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या रविराज साबळे यांनी तिसऱ्या क्रमांवरील सर्वाधिक मतं मिळवली. पण त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनीच महायुतीचे सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांचं भवितव्य ठरवलं. त्यांच्या मतांमुळं सतीश चव्हाण पराभूत झाले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील हे निवडून आले.

तत्पूर्वीच साबळे यांनी प्रतिक्रिया दिली होती की, "माझ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडून येणारा आमदार ठरणार आहे. मी एक प्रस्थापित गिळलायं, अठरा वर्षांचा दुष्काळ संपवला आहे", अशा शब्दांत साबळे यांनी तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना टोला लगावला होता. एकूणच चव्हाण यांच्याविरोधात सगळ्याच शक्ती एकवटल्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT