BMC Bonus: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! घसघशीत बोनस जाहीर, दिवाळीपूर्वीच हातात पडणार 'इतकी' रक्कम

Diwali Bonus announced for BMC employees: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.
Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic polls
BMC Diwali Bonus Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Diwali Bonus announced for BMC employees: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे, त्यामुळं यंदाची दिवाळी गोड होणार आहे. बोनसची रक्कम येऊन तुम्ही आवाक् व्हाल, कारण पालिका प्रशासनानं यंदा कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस जाहीर केला आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम कर्माचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Who won BMC elections 2026: Full list of winners in Mumbai civic polls
Naresh Mhaske: "ठाण्यात येऊन एकनाथ शिंदेंना टार्गेट कराल तर परत जाणार नाही"; नरेश म्हस्केंचा ठाकरे सेनेला इशारा

महापालिकेची बोनसची घोषणा

आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक अस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली जात आहे. काही सरकारी कार्यालयांनी याची घोषणा केली असून त्यात मुंबई महापालिकेनं देखील बुधवारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली. यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कामगार वर्ग या सर्वांचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बोनसच्या रक्कमेत वाढ करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

किती बोनस जाहीर?

मुंबई महापालिकेनं जास्तीत ३३,००० रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर केला आहे. गेल्यावर्षी बोनसची रक्कम ही ३१,००० रुपये इतकी होती, त्यात आता दोन हजार रुपयांनी वाढ केली आहे. पण पदानुसार, या बोनसच्या रक्कमेमध्ये फरक होऊ शकतो. या बोनसची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे या पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचीही माहिती मिळते आहे. यामुळं पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

केडीएमसीतही बोनस जाहीर

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेनं देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २१,००० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी या बोनसची घोषणा केली. इथल्या आशा सेविकांना ६,००० प्रत्येकी बोनस जाहीर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com