prakash ambedkar.jpg sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकले, म्हणाले, "मी राजकारणातला बाप"

Akshay Sabale

लोकसभेला वंचित बहुजन आघाडीनं 'सीट शेयरिंग'च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला टाळी न देता 'एकला चलो रे'चा नारा दिला. पण, प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितच्या एकाही उमेदवार यश मिळवता आलं नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभेला एकटं लढणार की आघाडी करणार? अशी चर्चा रंगली आहे. यातच पत्रकारानं विचारलेल्या एका प्रश्नावर प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकल्याचं दिसले.

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. तेव्हा, एका माध्यमाच्या प्रतिनिधिनं विधानसभा निवडणूक आणि वंचितशी संलग्न, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रकाश आंबेडकर संतापले. प्रतिनिधीनं आंबेडकर यांनी चांगलंच सुनावत मी राजकारणातला बाप असल्याचं सांगितलं.

नेमकं घडलं काय?

विधानसभेला वंचितकडून ( Vanchit Bahujan Aghadi ) उमेदवार देणार की नाही? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारायला सांगितला? तुझे जेवढं वय नाही, तेवढं माझं आयुष्य पत्रकारितेत गेलं आहे. पैसे घेऊन दुसऱ्यांना प्रश्न विचारला. मला नका विचारू. कारण, मी राजकारणात बाप आहे."

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे झाला. यावेळी 'शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा', असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच, "आम्ही काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात शांतता निर्माण झाली, गावागावांमधील दहशत संपली," असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित दिवाळी आधी होतील," असं भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT