Prakash Ambedkar On Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar On Sharad Pawar : 'शरद पवार भाजपमय झालेत'; भीमा कोरेगाव दंगलीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत आंबेडकरांचा निशाणा (VIDEO)

Prakash Ambedkar Criticizes Sharad Pawar for Alleged BJP Alliance in Latur : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या जुळवाजुळवीच्या राजकारणावर प्रहार केला.

Pradeep Pendhare

Sharad Pawar BJP alignment : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहिला नसल्याचे सांगत, शरद पवार देखील भाजपमय झाल्याचा दावा केला.

भीमा-कोरगाव दंगलीवर, शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिली होती. ते पत्र मागून देखील त्यावेळी मिळाली नाही आणि आता भाजपचे सरकार आहे. शरद पवार भाजपमय झाले असून, त्यावेळीसारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच राहिला नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने होणार आहेत. यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर कार्यकर्ता मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. जिथे पक्षाची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दौरे सुरू केल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. याच वेळी राज्यातील राजकारणावर भाष्य केले.

प्रकाश आंबेडकर लातूर दौऱ्यावर होते. तिथं माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ नाही आणि राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. कारण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे. शरद पवार (Sharad Pawar) देखील भाजप विरोधी काही वक्तव्य करत नाही, त्यामुळे विरोधी पक्ष अस्तित्वात नाही".

वंचित एकमेव विरोधी पक्ष

सर्व पक्षांचे एकमेकांशी साटेलोटे आहे, फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव विरोधी पक्ष आहे. अजित पवार अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्र होणार, अशा चर्चा आहेत. पाकिस्तान बरोबरच्या अघोषित युद्धामध्ये पंतप्रधान मोदींनी चांगली कामगिरी केल्याचं कौतुक शरद पवार यांनी केल्याकडे देखील प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

पवार भाजपविरुद्ध बोलतच नाही

काही वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव इथं दंगल झाली होती. या दंगलीच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आला होता. या दंगलीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शरद पवार यांनी पत्र देखील लिहिली होती. शरद पवार यांची हे पत्र मागून देखील, ते आम्हाला मिळाली नाहीत, त्याची पूर्तता झालेली नाही. शरद पवार विरोधात असून देखील सत्ताधारी भाजपवर बोलत नाहीत, एकप्रकारे ते भाजपमय झाल्याचे दिसते, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

भाजप सोडून इतरांशी समझोता करणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही भाजप सोडून इतर कोणाबरोबर समझोता करू. यातून काय राजकारण बाहेर पडतं, ते पाहू. आता सध्या आमच्या पक्षाचे 'ओव्हर ऑइलिंग' करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT