
Sanjay Raut book Narkatla Swarg : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकामधील वेगवेगळ्या खुलाशानं राज्यातील राजकीय संघर्ष उफाळला आहे. संजय राऊत यांनी हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिलं आहे. त्यामुळे पुस्तक सध्या चर्चेत आहे.
काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी निर्माण केलेल्या 'पीएमएलए' कायद्याचा भस्मासुर त्यांच्यावरच कसा उलटला हे सांगताना 'अल् कायदा ईडी' म्हटल्यावर अधिकारी कसा सटकला होता, याचा किस्सा संजय राऊत यांनी त्यांच्या पु्स्तकात मांडला आहे. यावरून 'ईडी'सारख्या संस्थेकडे असलेल्या पाशवी अधिकारांचा अंदाज लक्षात येतो, याकडे संजय राऊत लक्ष वेधतात.
खासदार संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग पुस्तकांचं शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन झाले. तत्पूर्वी या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेले विविध खुलाशांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले. विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या दाव्यांवरून भाजप नेते संजय राऊतांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते.
संजय राऊत यांनी 'ईडी'कडे असलेल्या पाशवी अधिकारांवरून काँग्रेस (Congress) नेते पी. चिंदबरम यांच्यावर हा भस्मासुर कसा उलटला याचा देखील सांगितला आहे. काँग्रेस युपीए सरकारच्या काळात सीबीआयचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु 'सीबीआय'ने लक्ष्मणरेषा कधी ओलांडली नाही. 'सीबीआय' पोलिस आहेत आणि 'ईडी' पोलिस नसतानाही, 'ईडी'ने टार्गेट करून राजकीय अटकेचा सपाटा लावल्याचा आरोप, संजय राऊत यांनी पुस्तकात केला आहे.
काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी 'पीएमएलए' कायद्याचा भस्मासुर निर्माण करायला घेतला होता. त्यावेळी त्यांना अनेकांनी सावध केलं होतं. पण चिंदबरम यांनी ऐकले नाही. सरकार जाताच, 'ईडी'ने चिंदबरम यांच्यावर कारवाई सुरू केली. देशाच्या माजी गृहमंत्री अटकेच्या भीतीने फरार झाला. आले त्यावेळी 'ईडी'चे पथक त्यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून आत घुसले होते. चिंदबरम यांना अटक झाली. 'पीएमएलए' कायद्याचा पहिला बळी चिंदबरम ठरले.
तीनशे कोटीची उलाढाल असलेल्या 'आयएनएक्स'मध्ये मनीलाँडरिंग प्रकरणात अटक झालेल्या चिंदबरम तीन महिन्यांनंतर जामिन घेत तुरुंगातून बाहेर आले. पुढे ही सवलत कुणालाच मिळाली नाही. ईडीने अटक केलेले अनेक जण चार-पाच वर्षांपासून तुरुंगात सडत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक विद्यमान भाजप सरकराच्या आदेशाचं पालन करीत आहेत. हुकमावरून हवे तसे निर्णय व निकाल देत आहेत. निवृत्तीनंतर फेव्हर्स घेतात, न्यायव्यवस्था घटना किंवा कायद्याचं पालन करणारी संस्था राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
'ईडी'च्या भयाने अनेक राजकारण्यांची गाळण उडाल्याचे सांगताना, अटकेत असताना दुसऱ्या रिमांडनंतर पुढच्या तारखेला न्यायालयात घेऊन गेले. त्यावेळी ईडीचे दोन तरुण अधिकारी बरोबर होते. तेव्हा त्यातील एकाने हसून, हात हलवला, न्यायालयाबाहेर जाताना त्याने विचारले की, 'क्या चल रहा हैं', सर? त्यावर 'जेल में किताब लिख रहा हूँ', असे सांगताना, त्याने त्यावर, 'क्या सब्जेक्ट?' असा प्रश्न केला. 'अल् कायदा ईडी!' असे उत्तर देताच, संबंधित 'ईडी'चा तरुण अधिकारी संतापला, सटकला, असे संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.