manoj jarange patil prakash ambedkar sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar and Manoj Jarange : '..तर निजामी मराठ्यांचा सुद्धा हिशोब करावा लागेल'; प्रकाश आंबेडकरांचं विधान!

Vanchit Bahujan Aghadi News : 'इतिहासामध्ये नाव कोरण्याची संधी जरांगे पाटील यांना आहे.' असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News : 'ज्यांनी सहकारी संस्था दूध संस्था सहकारी बँका उभारल्या त्यांनी गरीब मराठ्यांना पायही ठेवू दिला नाही. फडणवीस भाजपा यांचा हिशोब करायचा असेल तर निजामी मराठ्यांचा सुद्धा हिशोब करावा लागेल तरच गरीब मराठ्यांना न्याय मिळेल.' असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर परभणी येथे आयोजित एल्गार महासभेत बोलताना म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे. मात्र त्यांची एकच अट आहे माझं ताट मला राहू द्या तुमच्यासाठी वेगळं ताट करू ज्यामध्ये गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. इतिहासामध्ये नाव कोरण्याची संधी जरांगे पाटील यांना आहे. सहा महिन्यांपूर्वी ते कोण होते कोणालाच माहीत नव्हते.

तसेच, 'येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष 14 उमेदवार ओबीसी देईल तोच ओबीसींचा राजकीय पक्ष अस ठरवलं पाहिजे. कारण ओबीसीचे आरक्षण आमदार आणि खासदारच वाचवू शकतात.' असंही प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्यांना का डावलण्यात आले. ज्या तारखेला प्राणप्रतिष्ठा झाली त्या तारखेला शंकराचार्य येण्यास तयार नव्हते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हेकेखोरपणामुळे कार्यक्रम संपन्न झाला.

मराठा आमदार खासदारांना घरचा रस्ता दाखवा असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले. त्यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांना मराठा पाडल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना ऐकण्यात आल्या. पण तुम्ही एक आमदार पाडला तर राज्यातील ओबीसी, दलित भटके विमुक्त मतदार मराठा समाजाचे 107 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. असंही ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT